मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

शिंदे गटामध्ये इनकमिंग सुरू, आणखी 2 शिवसेना आमदार गळाला!

शिंदे गटामध्ये इनकमिंग सुरू, आणखी 2 शिवसेना आमदार गळाला!

शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात इनकमिंग सुरूच आहे. आणखी 2 शिवसेना आमदार शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत.

शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात इनकमिंग सुरूच आहे. आणखी 2 शिवसेना आमदार शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत.

शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात इनकमिंग सुरूच आहे. आणखी 2 शिवसेना आमदार शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत.

  • Published by:  Onkar Danke
मुंबई, 27 जून : शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात इनकमिंग सुरूच आहे. आणखी 2 शिवसेना आमदार शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत. त्यापैकी एक आमदार हा मुंबईतील असून एक ग्रामीण भागातील असल्याची सूत्रांची माहिती आहे. हे दोन आमदार लवकरच शिंदे गटामध्ये सहभागी होतील, अशी माहिती या गटाचे नेते आमदार दीपक केसरकर यांनी 'News18 लोकमत' ला फोनवरून बोलताना दिली आहे. शिंदे गटामध्ये सध्या 39 शिवसेना आमदार आहेत. हे दोन आमदार सहभागी झाल्यानंतर या आमदारांची संख्या 41 होणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे रविवारी शिंदे गटामध्ये सहभागी झाले. उदय सामंत उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय होते. सोबत शिवसेनेच्या बैठकांलाही ते उपस्थित होते. त्यामुळे त्यांचं शिंदे गटात सामील होणं, शिवसेनेसाठी नक्कीच अनपेक्षित होतं. शिंदे सुरतहून विशेष विमानानं गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेचे फक्त 3 मंत्रीच शिल्लक आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील जवळपास 49-50 आमदारांनी आमदारांनी बंड पुकारल्याने राज्यातील सरकार धोक्यात आहे. सरकार वाचवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत येण्यास तयार नसल्याची ठाम भूमिका एकनाथ शिंदे गटाने घेतली आहे.आम्ही येत्या 3-4 दिवसात निर्णय घेऊ आणि त्यानंतर थेट महाराष्ट्रात परत येऊ, असंही ते म्हणाले. महाराष्ट्र पोलिसांवर राज्यपाल नाराज, थेट गृहसचिवांना पत्र लिहून केली मागणी  शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्र विधानसभेत कोणत्याही क्षणी फ्लोर टेस्टला सामोरे जाण्यास तयार आहेत. मात्र त्याआधी विधानसभा उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे गटाला मान्यता द्यावी,आम्ही महाविकास आघाडी सरकारसोबत जाणार नाही, असं, केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.
First published:

Tags: Eknath Shinde, Maharashtra politics, Shivsena

पुढील बातम्या