शिवसेनेने हिंदुत्वासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांही सोडले, चंद्रकांत पाटलांचा पलटवार

शिवसेनेने हिंदुत्वासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांही सोडले, चंद्रकांत पाटलांचा पलटवार

शिवसेनेने हिंदुत्व सोडले, स्वातंत्र्यवीर सावकरांचा विषय सोडला, शिवाजी महाराज यांनाही सोडले...

  • Share this:

मुंबई,23 नोव्हेंबर: महाराष्ट्राच्या राजकारणात एका रात्री मोठी उलथापालथ झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोन्ही मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या सगळ्या घडामोडीमुळे बॅकफूटवर आलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसह अजित पवार यांच्यावर खोचक टीका केली. याला भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना पलटवार केला आहे.

24 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले. शिवसेनेने युतीने युती तोडली. पर्याय खुले ठेवले. महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेनेचा सर्व खेळ पाहिला. निकालानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका करतील, असे वाटत होते. मात्र, त्यांचे प्रेम वाढतच गेले. शिवसेनेने हिंदुत्व सोडले, स्वातंत्र्यवीर सावकरांचा विषय सोडला, शिवाजी महाराज यांनाही सोडले. संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली. आता तरी बोलणं बंद कर ना बाबा, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना टोला लगावला. आम्ही प्रत्येकवेळी मातोश्रीवर गेलो, पण त्यांना वेळ मिळाला नाही. ते सिल्वर ओकवर गेले. ते तरी ठिक, पण ते बाळासाहेब थोरात यांना भेटायला हॉटेलमध्ये गेले. संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली. आम्ही त्यांना सांगणारे कोण, आम्ही त्यांना सुचना करतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत?

राष्ट्रवादीतला एक मोठा गट फोडून अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी घणाघाती हल्लाबोल केला आहे. 'अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. भाजपने त्यांना तसं करण्यास भाग पाडलं आहे,' अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

'शरद पवार हे अजित पवारांच्या निर्णयासोबत नाहीत. अजित पवारांनी शरद पवारांच्याही पाठीत खंजीर खुपसला आहे,' असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

शरद पवार नाराज

'अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे,' असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी फुटली, हे आता स्पष्ट झालं आहे. भाजपला पूर्ण बहुमत नसल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या मदतीने त्यांनी हे सरकार स्थापन केलं आहे. अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

या सगळ्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीकडून फक्त अजित पवार कुटुंब दिसलं आहे. राष्ट्रवादीचे इतर कोणतेही नेते किंवा स्वत: शरद पवार हे यावेळी कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीतला एक मोठा गट फोडून अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिला का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जेव्हा या सगळ्या घटनाक्रमाबद्दल प्रतिक्रिया देतील, तेव्हाच याबाबतची स्पष्ट होऊ शकणार आहे.

एका रात्रीत उलथापालथ..

महाराष्ट्राला नव्हे तर देशाला धक्का देणाऱ्या घडामोडी एका रात्रीत घडल्या. शुक्रवारी संध्याकाळी महाविकासआघाडीचे पर्यायी सरकार देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बैठक पार पडली. मात्र, त्यात सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. या बैठकीला हजर असलेले अजित पवार दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत थेट भाजपबरोबरच्या सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 15 आमदार उपस्थित होते.

शुक्रवारच्या बैठकीत नेमकं काय?

एका रात्रीत नेमके काय घडले हे अजून पुरते स्पष्ट झालेले नाही, तरी पडद्यामागच्या घडामोडींचा भाग 1 हळूहळू समोर येत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बैठकीतून बाहेर पडताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, "माझ्याकडे आत्ता सांगण्यासारखे पूर्ण काही नाही. अर्धवट माहिती मी देणार नाही. अजून चर्चा सुरू आहे. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देईन." कुठलाही प्रश्न अनुत्तरित ठेवणार नाही, असे सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यातून चर्चा संपली नसल्याचे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 23, 2019 10:27 AM IST

ताज्या बातम्या