Home /News /mumbai /

राष्ट्रवादीमध्ये 'ऑल इज नॉट वेल', फूट पडण्याच्या भीतीनं 24 तासांमध्ये बदलली भूमिका

राष्ट्रवादीमध्ये 'ऑल इज नॉट वेल', फूट पडण्याच्या भीतीनं 24 तासांमध्ये बदलली भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 24 तासांपूर्वी सरकारच्या पाठिशी भक्कम राहण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर पक्षाला यु टर्न घ्यावा लागला आहे.

    मुंबई, 23 जून : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडी पक्षातील चलबिचल या बंडामुळे समोर आली आहे. शिवसेना आमदारांमधील नाराजी जाहीर पत्रातून बाहेर आली असतानाच राष्ट्रवादीमध्येही सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 24 तासांपूर्वी सरकारच्या पाठिशी भक्कम राहण्याची भूमिका राष्ट्रवादीनं बदलली असल्याची माहिती सूत्रानी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आज वाय.बी. चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर  राष्ट्रवादी काँग्रेस आता महाविकास आघाडी सरकारमधून पाठिंबा काढणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 24 तासांपूर्वी सरकारच्या पाठिशी भक्कमणे राहण्याची भूमिका राष्ट्रवादीनं जाहीर केली होती. पण, आजच्या बैठकीत आमदारांनी मांडलेल्या भूमिकेनंतर पक्षात फुट पडू नये म्हणून राष्ट्रवादीनं भूमिका बदलली असल्याचं मानलं जात आहे. काँग्रेस देखील नाराज शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shivsena Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातलं महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार धोक्यात आलं आहे, त्यातच आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस नाराज असल्याची माहिती आहे.काँग्रेस नेत्यांची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला एच.के.पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि नाना पटोले हे सहभागी होणार आहेत. या बैठकीत काँग्रेस मोठा निर्णय घेणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Ajit pawar, NCP, शरद पवार. sharad pawar

    पुढील बातम्या