Home /News /mumbai /

अग्निपरीक्षेसाठी भाजपा सज्ज, पक्षानं आमदारांना दिला मोठा आदेश

अग्निपरीक्षेसाठी भाजपा सज्ज, पक्षानं आमदारांना दिला मोठा आदेश

राज्यपालाच्या पत्रानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय.भारतीय जनता पक्षानं (BJP) सर्व आमदारांना महत्त्वाचा आदेश दिला आहे.

    मुंबई, 29 जून : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  (Governor Bhagat Singh Koshyari)  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. गुरूवारी होणाऱ्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी दिलेत. राज्यापालांनी तसं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. राज्यपालाच्या या पत्रानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. भारतीय जनता पक्षानं सर्व आमदारांना संध्याकाळपर्यंत मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. उद्या होणाऱ्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनापूर्वी राज्यपालांनी हा आदेश दिला आहे. भाजपाच्या प्रमुख नेत्यांची आज (बुधवार) दुपारी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. या बैठकीला फडणवीसांसह चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार , आशिष शेलार, गिरीश महाजन हे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत उद्या होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाबाबत पक्षाच्या तयारीचा आढावा घेतला जाईल. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेतली. सरकार अल्पमतात असल्याने निर्णयात हस्तक्षेप करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपालांकडे करण्यात आली होती.राज्यपालांना इमेलद्वारे आणि प्रत्यक्ष भाजपकडून पत्र देण्यात आले. या पत्रात राज्याच्या आताच्या परिस्थितीचा उल्लेख केला आहे. 'शिवसेनेचे 39 आमदार बाहेर आहेत. त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगावं, असं विनंती करणारं पत्र राज्यपालांना देण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लेख केला आहे. यावर राज्यपाल उचित निर्णय घेतील. अशी आम्हाला अपेक्षा आहे,' असे मत भाजपाने व्यक्त केले होते.  भाजपाच्या पत्रानंतर काही तासांमध्ये राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपाकडून घटनाविरोधी काम 'राज्यपालांकडे 12 आमदारांच्या नियुक्तीचं पत्र मागील गेल्या अडीच वर्षापासून पडून आहे. त्यावर अद्याप निर्णय होत नाही. मात्र बहुमत सिद्ध करण्याबाबत राज्यपालांनी प्रचंड वेगाने आदेश दिले. भाजप घटनाविरोधी काम करत आहे. सरकार डळमळीत होण्याची भाजप वाट पाहत होतं. त्यांच्या स्वप्नपूर्तीचा क्षण जवळ येत असल्याचं त्यांना वाटत आहे. मात्र हे इतसं सहज आणि सोपं नाही,' असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी असंवैधनिक असून याबाबत आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहेत, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. ठाकरे सरकारचा उद्या फैसला, वाचा राज्यपालांच्या पत्रातील 7 महत्त्वाचे मुद्दे राज्यपालांनी राफेल विमानापेक्षा जास्त वेगाने आदेश दिले आहे. मात्र आम्ही समजू शकतो त्यांच्यावरही कदाचित दबाव असेल, असा टोला राऊत यांनी लगावला.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: BJP, Devendra Fadnavis

    पुढील बातम्या