मुंबई, 19 जुलै: कोरोना महासाथीत दिवस-रात्र एक करीत..वेळेप्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस कर्मचारी तैनात होते. कोरोना काळात अनेक पोलिसांना आपला जीव गमवावा लागला. मात्र देशसेवेचं व्रत घेतलेले पोलीस कर्मचारी पाऊस असो वा ऊन अगदी कोरोना काळातही दिवस-रात्र काम करीत होते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ डोंबिवली स्टेशन रोड परिसरातील आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ठिकाठिकाणी पाणी जमा झाले आहे. रविवारी तर पावसामुळे निर्माण झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये तब्बल 43 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांकडून (Maharashtra Police) ठिकठिकाणी चौकशी, तपास सुरू आहे. आपात्कालिनक परिस्थितीत तातडीने मदत मिळावी यासाठी पोलीस कर्मचारी भरपावसात फिरताना दिसत आहे.
रस्त्याभर पाण्यातून पोलिसांच्या गाडीने अशी काढली वाट..डोंबिवली स्टेशन रोड परिसरातील व्हिडीओ... pic.twitter.com/4eGjxjvRLB
मागील तीन ते चार दिवसांपासून मुंबईला पावसानं झोडपून (Heavy rainfall in mumbai) काढलं आहे. शुक्रवारी मध्य रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. तर अनेकाच्या घरात पाणी शिरलं आहे. याशिवाय चेंबूर आणि विक्रोळी याठिकाणी इमारतीच्या भींती पडून मोठी दुर्घटना देखील घडली आहे. पण अशा या रिपरिप पडणाऱ्या पावसात मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि महानगरपालिकेचे कर्मचारी रात्रीचा दिवस करत आपलं कर्तव्य बजावत आहेत. स्वतः पावसात भीजत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी ते मदत करत आहेत.
असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) होतं आहे. ज्यामुळे मुंबई पोलिसांचा एक कर्मचारी जखमी झालेल्या बापलेकीला पाण्यातून सुरक्षित स्थळी घेऊन जाताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ मुंबई पोलिसांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी आम्ही ड्युटीवर आहोत याची जाणीव देखील करून दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.