Home /News /mumbai /

BREAKING : पोलिसांना मिळणार मुंबईत 50 लाखांमध्ये घर, राज्य सरकारची घोषणा

BREAKING : पोलिसांना मिळणार मुंबईत 50 लाखांमध्ये घर, राज्य सरकारची घोषणा

सरकारने आपल्या रक्षकांसाठी चांगले घरं निर्माण करण्यासाठी काम हाती घेतले पाहिजे, अशी सूचना शरद पवार यांनी सरकारकडे केली होती.

सरकारने आपल्या रक्षकांसाठी चांगले घरं निर्माण करण्यासाठी काम हाती घेतले पाहिजे, अशी सूचना शरद पवार यांनी सरकारकडे केली होती.

सरकारने आपल्या रक्षकांसाठी चांगले घरं निर्माण करण्यासाठी काम हाती घेतले पाहिजे, अशी सूचना शरद पवार यांनी सरकारकडे केली होती.

    मुंबई, 18 मे : काही दिवसांपूर्वी आमदारांना मोफत घरांची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांनी केली होती. पण, सर्वच स्तरातून टीका होत असल्यामुळे हे घर मोफत नसणार अशी सारवासारव गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली होती. आता मुंबईतील वरळी बीडीडी चाळमध्ये पोलिसांना घर देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पण, पोलिसांना या घरांसाठी 50 लाख रुपये मोजावे लागणार आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. यावेळी वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत चर्चा झाली. या बीडीडी चाळीत सध्या तिथं क्वाटर्समध्ये (worli bdd chawl police quarters) राहत असलेल्या पोलिसांना ५० लाख रूपयांना घरे दिली जातील. २२५० पोलीस कुटुंबीय तिथं राहत असून माणुसकीच्या भावनेतून त्यांचा विचार करण्यात आला आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. (Video : काही सेकंदात पत्त्यासारखा वाहून गेला लोखंडी ब्रिज; पावसाचं रौद्र रूप ) तसंच, या बीडीडी चाळीत पोलिसांना ५०० चौरस फुटांची घरे दिली जातील. ज्याचा वरळीत बांधकाम खर्च १ कोटी ५ लाख इतका आहे. त्यामुळे फुकटात अजिबात घरे दिली जाणार नाहीत. गिरणी कामगार आणि पोलीस यांची तुलना होऊ शकत नाही, असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं. 'मुळात ती पोलीस क्वाटर्स आहेत. त्यांचा यावर काहीही हक्क नाही. असं प्रत्येक ठिकाणी झाले तर पोलिसांना मुंबईत राहण्यासाठी क्वार्टर्स मिळणार नाहीत. हा धोरणात्मक निर्णय नाही, वरळीपुरता हा निर्णय आहे. फुकटात घर देणार नाही. त्यांचा मालकी हक्क नाही, सरकारने मोठ्या मनाने घरं देतंय. ५० लाख किंमत द्यावीच लागणार आहे, असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं. (इंद्राणीची लव्ह स्टोरी ते मुलीची मर्डर मिस्ट्री! जन्मदात्या आईने का घोटला गळा?) विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी मुंबईतील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला होता. यावेळी 'आपलं रक्षण करणारे पोलीस कर्मचारी हे राज्याचे मुख्य घटक आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा घराचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे. राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांचे क्वार्टर हे चांगले नाही. पोलीस कर्मचारी १६-१६ तास काम करतात पण त्यांना चांगला निवारा नाही. त्यामुळे पोलिसांनी हक्काचे घर मिळाले पाहिजे. सरकारने आपल्या रक्षकांसाठी चांगले घरं निर्माण करण्यासाठी काम हाती घेतले पाहिजे, अशी सूचना शरद पवार यांनी सरकारकडे केली होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Jitendra awhad, Maharashtra police, Uddhav thackeray

    पुढील बातम्या