थर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट

थर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट

गणपती डेकोरेशन करताना थर्मोकॉल बंदी केल्याने गणपती सजावट व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

  • Share this:

मुंबई, २१ ऑगस्ट- राज्यात प्लास्टिक बंदी झाल्यापासून थर्माकॉल व्यावसायिक चांगलेच अडचणीत आलेत. थर्माकॉल व्यावसायिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी गणपती डेकोरेशनकरिता किमान थर्माकॉल उत्पादनाची विक्री करून द्यावी अशी विनंती राज ठाकरेंना त्यांनी केली. थर्माकॉल व्यवसायात महाराष्ट्रात १४ हजार कारागीर असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. गणपती डेकोरेशन करताना थर्मोकॉल बंदी केल्याने गणपती सजावट व्यावसायिक अडचणीत आले आहेत. मागील सहा महिन्याआधी थर्मोकॉल उत्पादनाची किमान विक्री करून द्यावी अशी मागणी या व्यावसायिकांनी राज ठाकरे यांना केली होती. मात्र राज्य सरकाराने प्रदुषण बंदी घातली. त्यामुळे महाराष्ट्रातील १४ हजार कारागीर उघडड्यावर पडले आहेत असा दावा या संघटनेचे प्रतिनिधी सचिन धाहोतरे यांनी केला आहे. आता थर्माकॉल कर्मचाऱ्यांच्या मागणीवर राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

एकीकडे थर्माकॉल बंदीमुळे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. तर दुसरीकडे गिरगावमध्ये मंडप उभारण्यासाठी मुंबई महापालिकेनं मंडळांना परवानगी नाकारलीय. त्यामुळे शिवसेनेला आव्हान देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता मैदानात उतरले. बिनधास्त गणेशोत्सव साजरा करा दरवेळी आमचे सण आले की बंधनांच्या गोष्टी कशा काय सुरू होतात ? असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गिरगावच्या गणेश मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी दिली. याबद्दलच गणेश मंडळांना होणाऱ्या अडचणींबाबत तोडगा काढण्याबाबत मनसेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. मंडळांना परवानगी मिळताना होणारा त्रास आणि मिरवणुकींचा बदललेला मार्ग याविषयी या बैठकीत चर्चा झाली. यावेळी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती.

First published: August 21, 2018, 8:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading