• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • महाराष्ट्र आता पूर्णपणे अनलॉक? मुख्यमंत्री ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक

महाराष्ट्र आता पूर्णपणे अनलॉक? मुख्यमंत्री ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावली असून महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावली असून महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावली असून महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 ऑक्टोबर : गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोनामुळे (corona) महाराष्ट्राची वाट बिकट झाली होती. आता कोरोनाची (corona) लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा, शाळा, महाविद्यालय आणि मंदिरं उघडण्यात आली आहे. तसंच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यताही मावळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावली असून महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या सोमवारी दुपारी 3 वाजता राज्यातील कोविड टास्क फोर्सशी महत्वाची चर्चा करणार आहेत. अहमदनगर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये कोविड 19 संसर्गाचे रुग्णं संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नगरमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पण त्याचा परीणाम तिसऱ्या लाटेत होऊ नये तसंच इतर सुरक्षित जिल्ह्यातील अर्थव्यवस्था पुन्हा पुर्ववत करण्यासाठी सुरक्षित उपाययोजना करून सुरू असलेले निर्बंध उठवण्यासंदर्भात महत्वाची चर्चा होण्याची शक्यता व्यक्तं केली जात आहे. Bigg Boss 15: इशान-मायशाचे 'ते' चाळे पाहून भडकला सलमान; सुनावले खडेबोल राज्य पुन्हा एकदा अनलॉक करून अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी राज्य सरकार सुरक्षित उपाययोजनांचा आढावा घेऊन निर्णय जाहीर करणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. दिवाळीनंतर 2 डोसची अट शिथिल करणार दरम्यान, दसरा झाला आणि आता दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर आहे. यादरम्यान मोठ्या प्रमाणावर लोक गर्दी करतात, मंदिर उघडलेली आहेत अनेक कार्यक्रमांना परवानगी दिलेली आहे आणि चित्रपटगृहे देखील उघडणार यासर्व पार्श्वभूमीवर कोरोना संख्या कशी वाढते याचा अभ्यास करून कोविड निर्बंधांतून सूट देण्याबाबत मुख्यमंत्री स्तरावर निर्णय होऊ शकतो, असं संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. भररस्त्यात तरुणीला जबरदस्तीने काढायला लावला बुरखा; VIDEO VIRAL झाल्यानंतर... तसंच, लशीचे दोन डोसमधील अंतर अधिक असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून दिवाळीनंतर कोरोना केसेस कमी राहिल्या तर कोरोना लशीचा एक डोस घेतलेल्या व्यक्तीला टास्कफोर्सच्या सल्ल्यानुसार, उघडलेल्या सर्व  क्षेत्रातील उपक्रमामध्ये सहभागी होता येईल, असं वक्तव्यही राजेश टोपे यांनी केलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या काय घोषणा करता हे पाहण्याचं ठरणार आहे.
  Published by:sachin Salve
  First published: