LIVE : मुंबईमध्ये रविवारपासून लोकल रेल्वेच्या 610 जास्त फेऱ्या
कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स
Lokmat.news18.com | October 31, 2020, 11:36 PM IST
Last Updated October 31, 2020
auto-refresh
Highlights
9:41 pm (IST)
'उद्यापासून लोकल रेल्वेच्या 610 जादा फेऱ्या'
'प्रवाशांमध्ये योग्य अंतर राखण्यास मदत होईल'
गर्दी कमी होण्यास मदत -रेल्वेमंत्री पियूष गोयल
8:14 pm (IST)
बेळगाव - मराठी भाषिक उद्या करणार आंदोलन
एक नोव्हेंबर हा मराठी भाषिकांचा काळा दिन
उद्या सकाळी 10 पासून ठिय्या आंदोलन करणार
मराठा मंदिर सभागृहात मराठी भाषिकांचं आंदोलन
बेळगाव पोलिसांची अटींसह आंदोलनाला परवानगी
यंदाच्या मूक सायकल रॅलीला मात्र परवानगी नाही
8:07 pm (IST)
कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
कारखानदार आणि स्वाभिमानीची बैठक निष्फळ
जवाहर, बाबवडे साखर कारखान्याचा ऊस रोखला
ट्रक आणि ट्रॅक्टरचे टायर जाळण्याचा केला प्रयत्न
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक
7:59 pm (IST)
अमरावती - गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह खासदार नवनीत राणा यांची निर्दोष मुक्तता; खासदार नवनीत राणा यांचा उमेदवारी अर्ज भरताना आचारसंहिता भंगप्रकरणी गाडगेनगर पोलिसात दाखल झाला होता गुन्हा; अमरावती जिल्हा सत्र न्यायालयानं सर्वांना केलं दोषमुक्त
7:56 pm (IST)
कोरोना संकटात राज्यासाठी सकारात्मक बातमी
राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 90 टक्के
राज्यात दिवसभरात 5,500 नवे कोरोना रुग्ण
राज्यात दिवसभरात 74 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
राज्यात दिवसभरात 7,303 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात एकूण 1,23,585 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण
7:36 pm (IST)
मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद
'मराठा समाज संघर्ष यात्रा काढणार'
'सरकार गंभीर नाही म्हणून आम्ही खंबीर'
'काही मंत्री तेढ निर्माण करत आहेत'
'विजय वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा
'अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा'
'अन्यथा राज्यात फिरू देणार नाही'
'सरकारचं मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष'
मराठा क्रांती मोर्चाचा सरकारवर आरोप
4:57 pm (IST)
'भाजपवर टीका करणं ही संजय राऊतांची ड्युटी'
तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही; दरेकरांचा राऊतांना टोला
4:04 pm (IST)
'अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, कोणी कुठेही जाऊ शकतो'
विजय वडेट्टीवारांची उर्मिला मातोंडकर यांच्यावर टीका
3:35 pm (IST)
'ओबीसी-मराठा संघर्ष राज्य सरकार चिघळत ठेवतंय'
'संघर्षाची ठिणगी पडल्यास सरकार जबाबदार असेल'
विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा आरोप
1:43 pm (IST)
भक्ष्याच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत
बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू
नाशिक जिल्ह्यातील पेठ परिसरातील घटना