• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • LIVE : IPL 2020 हैदराबादचा दिल्लीवर सोपा विजय, 15 धावांनी नमवलं

LIVE : IPL 2020 हैदराबादचा दिल्लीवर सोपा विजय, 15 धावांनी नमवलं

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...

 • News18 Lokmat
 • | September 29, 2020, 23:40 IST
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  23:31 (IST)

  दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या सामन्यात हैदराबादच्या संघाने विजय मिळवला आहे. 

  23:31 (IST)

  हैदराबादने दिल्लीसमोर विजयासाठी 163 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दिल्लीला 20 षटकांत केवळ 147 धावाच करता आल्या. 

  23:30 (IST)

  हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 45, बेयरस्टोनं 53 तर केन विल्यमसनने वेगवान 41 धावांची खेळी केली. 

  23:30 (IST)

  प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या संघाला मोठी भागीदारी करण्यात अपयश आलं आणि त्यांचे एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले. दिल्लीकडून शिखर धवनने सर्वाधिक 34 धावा केल्या. 

  22:4 (IST)

  भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज सकाळी त्यांची चाचणी करण्यात आली होती. 
  दरम्यान, नायडू यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसून त्यांची प्रकृती चांगली आहे, असं उपराष्ट्रपती कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. 

  21:23 (IST)

  एकनाथ खडसेंची ऑडिओ क्लिप व्हायरल
  महिनाभरात पक्ष सोडणार -एकनाथ खडसे
  'दुसऱ्या पक्षात काय पद मिळतं, केवळ याची प्रतीक्षा'

  20:33 (IST)

  मराठा आरक्षणासंदर्भात 'वर्षा' बंगल्यावर झाली बैठक
  संभाजीराजे छत्रपतींनी उद्धव ठाकरेंशी केली चर्चा
  संभाजीराजेंसोबत अशोक चव्हाणही होते उपस्थित
  आर्थिक निकषांवर आरक्षण नको -संभाजीराजे छत्रपती
  'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागणी केली मान्य'
  'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सकारात्मक आश्वासन'
  'सामाजिक, शैक्षणिक मागासलेपणावर आरक्षण हवं'
  जाचक अटी मराठा समाजाला मान्य नाहीत -संभाजीराजे
  'मराठा आरक्षण लागू होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार'
  'एकाही खासदाराकडून मराठा समाजाची बाजू नाही'
  'आतापर्यंत राज्यसभा-लोकसभेत खासदारांची वाच्यता नाही'
  'मराठा समाजाच्या मोर्चांना ओबीसींचा पाठिंबा'
  मराठा समाज - ओबीसींचं वाकडं नाही -संभाजीराजे
  समाजाचा सेवक म्हणून काम करत राहणार -संभाजीराजे

  20:11 (IST)

  'मराठवाड्यातील अतिवृष्टीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या'
  देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्रातून मागणी

  20:2 (IST)

  एफटीआयआयच्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची निवड
  केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याची घोषणा
  दिग्दर्शक शेखर कपूर FTII चे अध्यक्ष म्हणून काम पाहणार
  3 मार्च 2023 पर्यंत शेखर कपूर यांचा कालावधी असणार

  19:50 (IST)

  'हमीभावानं उडीद खरेदीला 1 ऑक्टोबरपासून सुरुवात'
  पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

  कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...