liveLIVE NOW

LIVE : पंतप्रधान मोदींनी फोनवरून साधला अमेरिकेच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांशी संवाद

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 18, 2020, 00:06 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED A YEAR AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  0:4 (IST)

  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी संवाद साधत त्यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच कोव्हिड-19, हवामान बदल अशा विषयांवरही चर्चा करण्यात आली, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे.

  21:55 (IST)

  20 आणि 21 तारखेला होणाऱ्या छटपूजेला समुद्रकिनाऱ्यावर गर्दी करण्यास मुंबई महापालिकेची बंदी
  समुद्रकिनाऱ्याऐवजी कृत्रिम तलाव तयार केले जावेत असा सल्ला
  ज्या सामाजिक संघटना कृत्रिम तलाव तयार करतील त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या संघटनेची असेल
  सामाजिक अंतर ठेवावं लागेल, सोबतच ध्वनिप्रदूषण करता येणार नाही

  21:30 (IST)

  खंडाळा - दुधाचा टँकर पलटला, अपघातात एकाचा मृत्यू, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरची घटना

  20:56 (IST)

  राज्यात दिवसभरात 2,840 नवे रुग्ण
  राज्यात दिवसभरात 68 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात दिवसभरात 5,123 रुग्ण बरे
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 92.64 टक्के
  राज्यात सध्या 81,925 अॅक्टिव्ह रुग्ण

  20:37 (IST)

  ब्रेकिंग 

  20 आणि 21 तारखेला होणाऱ्या छटपूजेला समुद्रकिनाऱ्यावर गर्दी करण्यास मुंबई महापालिकेची बंदी

  समुद्रकिनाऱ्या ऐवजी कृत्रिम तलाव तयार केले जावेत असा सल्ला

  ज्या सामाजिक संघटना कृत्रिम तलाव तयार करतील त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या संघटनेची असेल

  सामाजिक अंतर ठेवावं लागेल, सोबतच ध्वनिप्रदूषण करता येणार नाही.

  छटपूजा हा उत्तर भारतीयांसाठी एक मोठा सण आहे, ज्यामध्ये पाण्यात उभा राहून सूर्याची उपासना केली जाते.

  19:10 (IST)

  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं राष्ट्रीय स्मारक
  'बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन'
  'जानेवारीत भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल'
  'जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानानं स्मारक साकारणार'
  शिवसेना नेते सुभाष देसाईंची माहिती
  'न्यूज18 लोकमत'शी एक्सक्लुझिव्ह बातचीत

  18:2 (IST)

  विज बिलांवर सवलत देणार नाही सांगणाऱ्या ऊर्जामंत्र्यांवर हक्कभंग आणणार, भाजप नेते अतुल भातखळकरांचा इशारा

  17:29 (IST)

  पुणे - पदवीधरसाठी 62 उमेदवार तर शिक्षक मतदारसंघासाठी 35 उमेदवार रिंगणात, पदवीधर मतदारसंघासाठी 16 जणांची तर
  शिक्षक मतदारसंघासाठी 15 जणांनी घेतली माघार

  16:26 (IST)

  IRCTCनं दोन्ही तेजस ट्रेन केल्या बंद
  23 नोव्हेंबरपासून दिल्ली-लखनौ ट्रेन बंद
  24 नोव्हेंबरपासून मुंबई-अहमदाबाद ट्रेन बंद
  ट्रेनवरील खर्च भरून निघत नसल्यानं निर्णय
  25% पेक्षाही कमी प्रवासी करत होते प्रवास
  कोरोनाचं संकट टळेपर्यंत तेजस ट्रेन बंद राहणार

  16:8 (IST)

  'बाळासाहेबांबद्दल मनात आदराची भावना'
  भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी केलं अभिवादन
  बाळासाहेबांच्या स्मृतींना केलं अभिवादन
  मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक
  जयसिंगराव गायकवाडांचा राजीनामा
  उमेदवारी न मिळाल्यानं नाराजी
  भाजपच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा
  'अधिक ताकद लावून पुनर्बांधणीचा विचार'
  भाजप नेत्या पंकजा मुंडेंचं वक्तव्य
  'अधिक वीजबिल वसुली अन्यायकारक'
  'लॉकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार गेलेत'
  वीजबिलात सवलत गरजेचं -पंकजा मुंडे

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स