केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून देशभरातील शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार गाईड-लाईन्सही दिल्या. पण राज्यातील शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील संस्था चालक तसंच शिक्षण तज्ञ समवेत चर्चा केली. त्यात बहुतेक शिक्षण संस्थाचालक यांनी ग्रामीण भागात कोरोना रूग्ण वाढत असल्यामुळे शाळा तुर्तास सुरू करण्सास हरकत घेतली.
राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा केली जाणार आ. तुर्तास इयत्ता 10 आणि 9 वी चा वर्ग सुरू करण्याचा विचार नाही, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत असल्याने सप्टेंबरअखेर शाळा सुरू करण्याबाबत बहुतेकांचं प्रतिकूल मत आहे, असंही गायकवाड यांनी सांगितलं.
राजधानी मुंबईतील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणखी वेगाने वाढू लागला आहे. मुंबईत 3 प्रभागांनी रुग्णसंख्येबाबत 10 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. 3 वॉर्डात 10 हजारांपेक्षा अधिक कोविड रुग्ण आढळले आहेत. आर मध्य, पी उत्तर आणि के पूर्व या 3 प्रभागातून ही आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे मुंबईतील पश्चिम उपनगरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचं दिसत आहे.
तसंच मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता 56 दिवसांवर पोहोचला आहे.