liveLIVE NOW

LIVE : भाजप नेते आशिष शेलार यांना धमकीचे फोन, मुंब्र्यातून दोघांना अटक

मुंबईसह महाराष्ट्र आणि देशातल्या महत्त्वाच्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स एका क्लिकवर

 • News18 Lokmat
 • | October 13, 2020, 18:30 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED A YEAR AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  22:15 (IST)

  हैदराबाद शहराला मुसळधार पावसाचा फटका
  हैदराबाद शहरात पूर परिस्थितीचं चित्र
  चारमिनारसह अनेक भागात गाड्या गेल्या वाहून
  जोरदार पावसामुळे विजयवाडा-हैदराबाद हायवे बंद

  21:58 (IST)

  मेहबुबा मुफ्तींची 14 महिन्यांनंतर नजरकैदेतून मुक्तता
  जम्मू-काश्मीरमध्ये 370 हटवल्यानंतर होत्या नजरकैदेत

  21:6 (IST)

  मुंबईसह महानगरातील वीज खंडित प्रकरण
  दिल्लीची केंद्रीय ऊर्जा विभागाची तज्ज्ञ टीम मुंबईत
  केंद्रीय ऊर्जा विभागाच्या टीममध्ये टेक्निकल एक्सपर्ट
  उद्या प्रत्यक्ष घटनास्थळ, अधिकाऱ्यांशी करणार चर्चा
  मानवी चूक होती की तांत्रिक चूक होती? याबाबत तपास

  21:2 (IST)

  पश्चिम रेल्वेमार्गावर 15 ऑक्टोबरपासून 700 फेऱ्या
  पश्चिम रेल्वेमार्गावर 194 फेऱ्यांची वाढ

  20:49 (IST)

  डाळींच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी पाऊल
  केंद्र सरकारनं घेतला कडधान्य आयातीचा निर्णय
  4 लाख टन तूर, 1.5 लाख टन उडदाची होणार आयात
  आयात कोटा 1504 खरेदीदार व्यापाऱ्यांना दिला वाटून
  महागाईवर नियंत्रणासाठी केंद्र करणार तूर-उडदाची आयात

  20:47 (IST)

  राज्यात पुढील 4 दिवसांत वादळी पावसाचा अंदाज
  जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला महसूल विभागाचं पत्र
  किनारपट्टी भागात विशेष काळजी घेण्याचे आदेश
  प्रशासनाला सतर्क राहण्याच्या दिल्या सूचना

  20:6 (IST)

  पुण्यात आज कोरोनाचे 486 नवे रुग्ण
  पुण्यात आज 998 रुग्णांना डिस्चार्ज
  पुण्यात आज 30 कोरोना रुग्णांचा मृत्यू

  20:5 (IST)

  कोरोना काळात राज्यासाठी दिलासादायक बातमी
  राज्यात आज 8 हजार 522 नव्या रुग्णांची भर
  राज्यात आज कोरोनामुळे 187 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात आज 15 हजार 356 रुग्ण कोरोनामुक्त
  राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 84.03 टक्के

  19:48 (IST)

  पुण्यात उद्यापासून क्रिकेट, खो-खो खेळांच्या सरावासाठी परवानगी
  बॅडमिंटन, लॉन टेनिस खेळांच्या सरावासाठी परवानगी
  लॉकडाऊनपासून पुण्यात सर्व प्रकारच्या खेळांवर होती बंदी
  मैदानांवर जाऊन खेळांचा सराव करण्यास परवानगी
  सराव करताना नियम आणि अटींचं पालन बंधनकारक
  मात्र कोणत्याही प्रकारच्या क्रीडा स्पर्धा भरवण्यास मनाई

  19:6 (IST)

  साई मंदिर उघडण्यासाठी शिर्डीत एल्गार
  साई मंदिरात प्रवेश करण्याचा आंदोलकांचा प्रयत्न
  साधू-संत-महंत-वारकऱ्यांना पोलिसांनी केली अटक
  मंदिर प्रवेश नाकारला, सरकारविरोधात घोषणाबाजी
  शिष्टमंडळालाही मंदिर प्रवेश नाकारला
  आचार्य तुषार भोसलेंसह आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

  मुंबईसह महाराष्ट्र आणि देशातल्या महत्त्वाच्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स एका क्लिकवर