LIVE NOW

LIVE : मुंबईत उद्धव ठाकरे-शरद पवारांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक

मुंबईसह महाराष्ट्र आणि देशातल्या महत्त्वाच्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स एका क्लिकवर

Lokmat.news18.com | October 12, 2020, 10:18 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated October 12, 2020
auto-refresh

Highlights

10:18 pm (IST)

मुलुंडमधील कोविड रुग्णालयाला लागली होती आग, आगीतून 39 कोरोनाग्रस्तांना वाचवण्यात यश, शॉर्टसर्किटमुळे रुग्णालयाला आग लागल्याचा अंदाज, मुलुंडमधील कोविड रुग्णालयात वृद्ध रुग्णाचा मृत्यू

9:03 pm (IST)

बेजबाबदार मीडिया हाऊसेसविरोधात 'खान' एकवटले
शाहरुख, सलमान, आमिर खान यांची कोर्टात धाव
बॉलिवूडची प्रतिमा मलीन केल्याची दाखल केली तक्रार

 

9:02 pm (IST)

मुलुंडमधील कोविड रुग्णालयाला लागली होती आग
रुग्णालयाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता
आगीतून 39 कोरोनाग्रस्तांना वाचवण्यात यश
कोरोनाग्रस्तांना दुसऱ्या कोविड रुग्णालयात केलं दाखल

 

8:18 pm (IST)

कोरोना संकटात राज्यासाठी सकारात्मक बातमी
राज्यात आज 7 हजार 89 नव्या रुग्णांची भर
राज्यात आज कोरोनामुळे 165 रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज 15,656 रुग्ण बरे होऊन घरी
राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 83.49 टक्के
राज्यात आजपर्यंत 2 लाख 12,439 अॅक्टिव्ह रुग्ण

 

7:44 pm (IST)

पुणे - कोरोनाची गेल्या 4 महिन्यांतील नीचांकी वाढ
पुण्यात दिवसभरात फक्त 351 नवे रुग्ण सापडले
पुण्यात दिवसभरात 950 रुग्णांना डिस्चार्ज
अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 12,285 पर्यंत घटली
पुण्यात दैनंदिन मृत्यूसंख्याही 25 पर्यंत घसरली
पुण्यात 856 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू

 

7:01 pm (IST)

पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराचा थरार
गोळीबारात वाळू व्यावसायिक जखमी
वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतली घटना
गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार

6:55 pm (IST)

कोल्हापूर - शिवाजी महाराज पुतळा वाद प्रकरण
बांबवडे गावातील शिवरायांचा पुतळा काढला
कडेकोट पोलीस बंदोबस्तात पुतळा काढला
दुग्धाभिषेक, विधिवत पूजा करून पुतळा काढला
आंदोलनकर्त्या नागरिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
परवानगीनंतर रीतसर पुतळा बसवण्यास प्रशासन तयार
शाहूवाडी तालुक्यातील बांबवडेमधील तणाव निवळला

 

6:14 pm (IST)

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट
'वर्षा' बंगल्यावर उद्धव ठाकरे-शरद पवार यांची चर्चा
बिहार निवडणूक एकत्र लढण्यासंदर्भात चर्चा -सूत्र

 

6:04 pm (IST)

मुंबईसह महानगरातील वीज खंडित प्रकरण
मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा'वर घेतली महत्वपूर्ण बैठक
ऊर्जा विभागाला टेक्निकल ऑडिटचे आदेश
वीजपुरवठा खंडित प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल
काही बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
'तीनही वाहिन्या तात्काळ पूर्ण क्षमतेनं सुरू करा'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बैठकीत दिले आदेश
असा प्रकार पुन्हा न होण्यासाठी काळजी घ्या -मुख्यमंत्री
'मुंबईत 95 तर नवी मुंबईत 80% वीजपुरवठा पूर्ववत'

 

5:49 pm (IST)

ब्रेकींग - 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट होण्याची शक्यता 

आज संध्याकाळनंतर या दोन नेत्यांमध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे समजते 

राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी तसंच प्रशासकीय विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती

Load More
मुंबईसह महाराष्ट्र आणि देशातल्या महत्त्वाच्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स एका क्लिकवर