• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • LIVE: रॉजर पेनरोज, रिनहार्ड गेंझेल आणि एन्ड्रिया गेझ या 3 शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातलं नोबेल जाहीर

LIVE: रॉजर पेनरोज, रिनहार्ड गेंझेल आणि एन्ड्रिया गेझ या 3 शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातलं नोबेल जाहीर

मुंबईसह राज्यातील कोरोनाचे अपडेट्स आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात

 • News18 Lokmat
 • | October 06, 2020, 18:14 IST
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  21:58 (IST)

  राज्यात आज कोरोनाच्या 12,258 नवीन रुग्णांची भर
  राज्यात आज 17,141 रुग्ण बरे होऊन घरी
  राज्यात आज 370 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू
  राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 80.48 टक्क्यांवर
  राज्यात सध्या 2 लाख 47 हजार 23 अॅक्टिव्ह रुग्ण

  21:53 (IST)

  पालघर - डहाणू, तलासरीत भूकंपाची मालिका सुरूच, आज दिवसभरात बसले भूकंपाचे 3 धक्के, भूकंपाच्या धक्क्यांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

  21:17 (IST)

  अंतिम वर्ष पदवी ऑनलाईन परीक्षा आयोजनातील घोळ
  'चौकशी करण्यासाठी शोध समिती स्थापन करावी'
  'दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा'
  उच्च-तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांकडे पत्राद्वारे केली मागणी
  मुंबई विद्यापीठातील सिनेट सदस्यांची आग्रही मागणी
  शिवसेनाप्रणीत युवा सेनेचे मुंबई विद्यापीठातील सिनेट सदस्य

  21:11 (IST)

  गडचिरोली - गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षेत अतिदुर्गम भागात ऑफलाईन सेंटर वाढवण्यासाठी गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंचा पुढाकार
  गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षेत नेट कनेक्टिव्हिटीअभावी झालेला गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी 'न्यूज18 लोकमत'नं दाखवल्या होत्या, एकनाथ शिंदेंनी दखल घेऊन तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी केली चर्चा, सामंतांनी गडचिरोलीच्या प्रभारी कुलगुरूंना तशी सूचना करून निर्णय घेण्याचं दिलं आश्वासन

  20:3 (IST)

  सोलापूर - ऑनलाईन परीक्षांचा घोळ संपता संपेना, सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सर्व्हर क्रॅश झाल्यानं पुढे ढकलल्या; 7 आणि 8 तारखेच्या परीक्षा 22 आणि 23 ऑक्टोबरला होणार, सोलापूर विद्यापीठ प्रशासनाची माहिती

  19:39 (IST)

  सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली महत्वाची बैठक
  शेती, पणनसंबंधी केंद्राच्या कायद्यांवर बैठकीत विचारविनिमय
  धोरण निश्चितीसाठी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा
  बैठकीला काही शेतकरी नेतेही ऑनलाईन होते सहभागी
  शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडल्या सूचना आणि मतं
  'कोणत्याही पक्षाचे असलात तरी शेतकरी हितासाठी एकत्र या'
  आपण केंद्र सरकारच्या विरोधात नाही -उद्धव ठाकरे
  कायद्यातील त्रुटी, उणिवा दूर करणं महत्वाचं -मुख्यमंत्री

  18:58 (IST)

  राज्य सरकारच्या महसूल विभागाला धक्का
  अलिबाग उपविभागीय अधिकारी शारदा पोवारांची बदली रद्द
  आमदार महेंद्र दळवींच्या दबावात बदली केल्यानं कोर्टानं ओढले ताशेरे
  दळवींच्या पत्नीच्या कंपनीला 6 कोटींचा ठोठावलेला दंड
  शारदा पोवारांनी अवैध गौण खनिजप्रकरणी केला होता दंड
  अॅड.गुणवंत सदावर्ते यांनी मांडली बाजू
  न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी दिला निर्णय

  18:50 (IST)

  राहुल गांधींची किसान यात्रा हरियाणा सीमेवर रोखली
  हरियाणात प्रवेश मिळेपर्यंत किसान यात्रा इथं थांबून राहणार
  पंजाब-हरियाणा सीमेवर वातावरण तापलं
  कृषी विधेयकाविरोधात काँग्रेसची ठिकठिकाणी आंदोलनं

  17:55 (IST)

  भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर
  यंदा 3 शास्त्रज्ञांना विभागून दिला पुरस्कार
  रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल, एंड्रिया गेज यांचा सन्मान
  3 शास्त्रज्ञांचा भौतिकशास्त्रातील 'नोबेल'नं गौरव

  17:33 (IST)

  विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, सरकार दक्षता घेईल -सामंत
  मोबाईल नंबर, सर्व्हरच्या अडचणीमुळे गोंधळ -उदय सामंत
  विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार पुन्हा परीक्षा घेणार -सामंत
  पदवीमध्ये कोणत्याही अडचणी येणार नाहीत -उदय सामंत
  उच्च-तंत्रशिक्षण मंत्र्यांची 'न्यूज18 लोकमत'ला माहिती
  मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षेत तांत्रिक अडचणी
  बीकॉमच्या अंतिम वर्षाचा पेपर पुढे ढकलला
  पेपर पुढे ढकलल्यानं कॅम्पसमध्ये झाला होता गोंधळ

  मुंबईसह राज्यातील कोरोनाचे अपडेट्स आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात