liveLIVE NOW

LIVE : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पश्चिम रेल्वे आता 500 लोकल चालवणार

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी.

 • News18 Lokmat
 • | September 18, 2020, 21:50 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 10 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:49 (IST)

  पश्चिम रेल्वे आता 500 लोकल चालवणार

  21 तारखेपासून 150 अतिरिक्त लोकल

  आतापर्यंत 350 लोकल धावत होत्या

  वाढती गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेच्या निर्णय

  21:36 (IST)

  सातारा - पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे वीर जवान सचिन संभाजी जाधव लेह-लडाख सीमेवर कर्तव्य बजावताना शहीद, उद्या अंत्यसंस्कार

  21:24 (IST)

  'एका राज्यातून दुसर्‍या राज्यात ऑक्सिजन पुरवठा सुनिश्चित केला जावा'
  केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांचं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र

  21:5 (IST)

  'स्वतंत्र लढलो असतो तर 150 पेक्षा जास्त जागा आल्या असत्या'
  2019 विधानसभा निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचा दावा

  20:46 (IST)

  बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रात एम.एम.आर.डी.ए. च्‍या पुढाकाराने अनेक ठिकाणी मेट्रो रेल्‍वेची कामे सुरु आहेत. याच मेट्रो रेल्‍वेच्‍या कामासाठी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील पिलर नं.155 ते 156 दरम्यान असणारी 1200 मि‍ली मीटर व्यासाची  जलवाहिनी वळविण्याचे काम दिनांक 22 सप्‍टेंबर 2020 रोजी सायंकाळी 5.30 वाजल्‍यापासून ते दिनांक 23 सप्‍टेंबर 2020 रोजी पहाटे 4.30 वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. 
  यामुळे सदर कालावधीत म्‍हणजेच दिनांक 22 सप्‍टेंबर 2020 व दिनांक 23 सप्‍टेंबर 2020 रोजी ‘के पश्चिम’, ‘के पूर्व’ व ‘पी दक्षिण’ या तीन विभागातील काही परिसरांमध्‍ये पाणी कपात होण्‍यासह  पाणीपुरवठय़ाच्या वेळेतही तात्‍पुरता बदल करण्यात येणार आहे. तसेच यामुळे सदर परिसरांमध्‍ये पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. ही बाब लक्षात घेऊन संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्‍याचा यथायोग्‍य साठा करावा आणि पाणी जपून वापरत बृहन्मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्‍या जल अभियंता खात्‍याद्वारे करण्‍यात येत आहे. 

  20:10 (IST)

  तब्बल महिनाभरानंतर रुग्ण बरे होण्याची संख्या वाढली
  नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक
  राज्यात आज तब्बल 22 हजार रुग्ण कोरोनामुक्त
  राज्यात आज कोरोनाचे 21 हजार 600 नवे रुग्ण
  राज्यात आज दिवसभरात 401 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
  राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी वाढली 71.47%

  19:3 (IST)

  महाविकास आघाडी सरकारचं महामंडळ वाटप अंतिम टप्प्यात 
  पितृपक्ष संपल्यानंतर घोषणा होण्याची शक्यता
  सिडको - कॉंग्रेस, म्हाडा - शिवसेनेकडे ?
  महिला आयोग राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता
  ज्या विभागाचं मंत्रिपद नाही त्या पक्षाला महामंडळाचं अध्यक्षपद
  मंत्रिपद संख्यावाटपाच्या प्रमाणात महामंडळाचं वाटप 
  सदस्यसंख्याही त्याच आधारावर ठरणार

  18:33 (IST)

  'कोविड19 च्या काळात रेल्वे व इतर सार्वजनिक वाहतूक बंद आहे. याकाळात महिलावर्गाला कोणतीही अडचण होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने येत्या सोमवारपासून शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार महिला विशेष फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे,' अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. 

  18:23 (IST)

  आता पूर्ण क्षमतेनं एसटी धावणार -परिवहन मंत्री
  एसटी कर्मचाऱ्यांचे पगार लवकरच होणार -अनिल परब

  18:0 (IST)

  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योद्धा -देवेंद्र फडणवीस
  'पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाची स्थिती सुधारली'
  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक कणखर नेतृत्व -फडणवीस
  'मोदींनी गरीब कल्याणाचा मोठा कार्यक्रम हाती घेतला'
  'प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत योजना, जनधन'
  'मोदींनी अनेक योजनांतून गरिबांना अर्थव्यवस्थेत सामावून घेतलं'
  'भारत 11व्या क्रमांकावरून जगातील पहिल्या 5 अर्थव्यवस्थेत'
  ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची दूरदृष्टी आहे -देवेंद्र फडणवीस
  कोरोनाच्या काळातही भारतात विक्रमी FDI आला -फडणवीस
  'मोदींनी शेतकरी वर्गासाठी सर्वाधिक कल्याणाच्या योजना राबविल्या'
  संरक्षण क्षेत्रातही भारताची मोठी भरारी -देवेंद्र फडणवीस
  पुलवामा,उरी,डोकलाम,गलवान या घटना सांगतात हा 'नवा भारत'
  'मोदी हे केवळ बोलणारे नाही तर काम करून दाखविणारे नेतृत्व'

  मुंबई, 18 सप्टेंबर : कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी.