Home /News /mumbai /

मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांची मध्यरात्री भेट घेतली? जाणून घ्या Viral Photo मागील सत्य

मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांची मध्यरात्री भेट घेतली? जाणून घ्या Viral Photo मागील सत्य

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली असा फोटो व्हायरल झाला होता.

    मुंबई, 6 जुलै : मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली, असा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  पवारांचे मुंबईतील निवावस्थान सिल्व्हर ओकवर ही भेट झाली. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं गेलं. मागील दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पालिकेच्या आपत्तीव्यवस्थापन कक्षात गेले होते. त्यानंतर ते थेट पवारांच्या निवावस्थानी गेले. या भेटी दरम्यान मुख्यमंत्री एकटेच होते, त्यांच्यासोबत अन्य कोणताही नेता नव्हता, अशी माहिती एका फोटोसह फिरत होती. या माहितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री? 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये,' असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांनी तसा खुलासा करणारे ट्विटच केले आहे.
     पवारांनी केलं होतं भाकित
    "महाराष्ट्रातील नवं सरकार, शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकांसाठी तयार राहा", असं भाकित शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केले होते. उद्धव ठाकरेंचा 'रिक्षावाल्या'वर निशाणा, एकनाथ शिंदेंचं 'मर्सिडिज' काढून प्रत्युत्तर "आपण राष्ट्रवादी काँग्रेस सध्या विरोधी बाकावर बसणार असलो तरी मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ द्या. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना पाहायला मिळेल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडलं तर मध्यावधी निवडणुका लागतील. त्यामुळे तयारी आत्तापासून करायला लागा", अशी महत्त्वाची सूचना शरद पवार यांनी आपल्या आमदारांना दिली. होती.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Eknath Shinde, शरद पवार. sharad pawar

    पुढील बातम्या