महाविकासआघाडीच्या बैठकीत काय ठरलं? हे आहेत 10 महत्त्वाचे मुद्दे

महाविकासआघाडीच्या बैठकीत काय ठरलं? हे आहेत 10 महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या बैठक मुंबईत झाली.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर :  राज्यात पर्यायी सरकार देण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांच्या दिग्गज नेत्यांची बैठक मुंबईत झाली. महाविकासआघाडीची पहिलीच संयुक्त बैठक होती. ती दोन तासांहून अधिक काळ चालली. बैठकीतून पहिल्यांदा शरद पवार आणि पाठोपाठ उद्धव ठाकरे बाहेर पडले. नेमकं काय ठरलं या बैठकीत?

-मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सर्वसंमती

-महाविकास आघाडीची उद्या पत्रकार परिषद होणार

-इतर मुद्यांवर अद्यापही चर्चा सुरूच राहणार

-कॉंग्रेस आणि राष्ट्रवादींच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरूच

-विधानसभा अध्यक्षपदावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच

-चर्चा योग्य दिशेनं सुरू आहे- - उद्धव ठाकरे

-कोणताही मुद्दा सुटू नये यासाठी प्रयत्न- - उद्धव ठाकरे

-तिन्ही पक्षांचे एकमत झाल्यावरचं जनतेपुढे जावं- - उद्धव ठाकरे

-चर्चा सुरू काही मुद्दे अजून स्पष्ट करतो, सकारात्मक चर्चा सुरू- उद्धव ठाकरे

-उद्या पत्रकार परिषदेनंतर सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता

दोन तासांनी या बैठकीतून शरद पवार आणि उद्धव ठाकरे बाहेर पडले.  "मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे  यांच्या नावावर सहमती झाली", अशी मोठी बातमी शरद पवार यांनी या महाबैठकीतून बाहेर आल्यानंतर दिली. याचा अर्थ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याचं उत्तर या बैठकीतून समोर आलं आहे. उद्धव यांनी मात्र याविषयी अधिक बोलण्यास नकार दिला. अजूनही बैठक सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. "मला अर्धवट माहिती द्यायची नाही. जेव्हा आम्हाला काही सांगण्यासारखं असेल तेव्हा तीनही पक्ष सांगू. सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देऊ", असं उद्धव म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2019 07:19 PM IST

ताज्या बातम्या