मुंबई, 16 नोव्हेंबर : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबईत (Mumbai) सुरू आहे. या बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aghadi) जोरदार टीका केली आहे. भाजपचे नेते सी. टी. रवी यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर (BJP criticise CM Uddhav Thackeray) निशाणा साधत टीका केलीय. तसेच राज्याला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासारखा पूर्णवेळ मुख्यमंत्री हवा आहे असंही त्यांनी म्हटलं.
भाजपचे प्रभारी सी. टी. रवी यांनी म्हणाले, हे सरकार महाविकास आघाडी नाहीये तर महाराष्ट्र विनाश आघाडी आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पार्ट टाईम मुख्यमंत्री आहेत. राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे फुल टाईम मुख्यमंत्री हवेत. ते कधी झोपतात, कधी उठतात काय काम करतात हे महाराष्ट्रातील जनतेला, सर्वांनाच माहिती आहे. महाविकास आघाडीला सरकारमध्ये राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाहीये.
चंद्रकांत पाटलांचाही मुख्यमंत्र्यांवर निशाणा
चंद्रकांत पाटील म्हणाले, मालेगावात नागरिक रस्त्यावर उतरतात आणि पोलिसांवर दगडफेक करतात. शे-दोनशे नाही तर हजारो नागरिक रस्त्यावर एकत्र येतात कसे? याच्या मागे कोण? कोण हे पसरवत आहे? गावोगावात बाळासाहेबांनी हिंदुंच्या रक्षणाचं काम केलं आणि त्यांचे वारस म्हणतात या दंगलीत भाजपचा हात आहे.
वाचा : '24 कॅरेटची शिवसेना बदलली' म्हणणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांना अनिल परबांचा टोला, म्हणाले...
आशिष शेलार म्हणाले, तिसरा राजकीय प्रस्ताव हा राजकारण्याचे गुन्हेगारीकरण हा आहे. महाराष्ट्राचे दुर्देव की कार्यकारिणीमध्ये राजकारणातील गुन्हेगारीचा प्रस्ताव मांडावा लागतो. शपथेवर ज्यांनी राज्याला सुरक्षित करण्याएवजी ज्यांनी हवालदाराला बदडले अशी व्यक्ती मंत्री आहे. एका मंत्र्याच्या पीएने आत्महत्या केली आणि माहिती दिली तरी राजरोस फिरतोस. ठाकरे सरकार हे गुन्हेगारी आणि गुन्हे करणाऱ्याचे समर्थक आहे.
काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं, महाराष्ट्राच्या विविध विषयांवर चिंतन व्हावं, राज्याची आर्थिक प्रगती व्हावी यापेक्षा राजकारण करण्यात राज्यकर्ते गुंतलेले आहेत. बाळासाहेबांच्या 24 कॅरेट हिंदुत्वाच्या पक्षाला मतदान केले. आता ती शिवसेना राहिलेली नाहीये. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न हिंदुत्वाचं होतं मुख्यमंत्री होण्याचं कधीच नव्हतं.
सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, 1960 नंतरचे सर्वात निकम्मे हे सरकार आहे. शेतकरी सन्मान योजनेचे महिलांचे दिव्यांगाचे पैसे दिले नाही. या सरकारमध्ये स्मशान शांतता आहे. सगळीकडे सामसूम आहे. अतिशय निम्न स्तरावर राजकारण सुरू आहे. आपण काय बोलतो यांचे भान राहीले नाही. राज्याचे गृहमंत्री राहिलेले जेलमध्ये, पोलीस आयुक्त फरार असे चित्र कधीच महाराष्ट्राने पाहिले नव्हते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Uddhav thackeray, महाराष्ट्र