अंडरवर्ल्‍ड डॉन दाऊदच्या पुतण्याला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अंडरवर्ल्‍ड डॉन दाऊदच्या पुतण्याला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिझवान कासकरच्या मुंबई पोलीस क्राईम ब्रांचनं मुसक्या आवळल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 18 जुलै : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिझवान कासकरच्या मुंबई पोलीस क्राईम ब्रांचनं मुसक्या आवळल्या आहेत. खंडणीप्रकरणी मुंबई पोलिसांनी रिझवानविरोधात कारवाई केली आहे. रिझवान हा इकबाल कासकरचा मुलगा आहे. रिझवान देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी विमानतळावर सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. दरम्यान, खंडणी मागितल्याप्रकरणीच इकबाल कासकरदेखील कारागृहात शिक्षा भोगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छोटा शकीलचा साथीदार अफरोझ वदारिया याला हवाला प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्याची चौकशी सुरू असताना रिझवानचं नाव समोर आलं. यानंतर याच प्रकरणात दाऊदच्या पुतण्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकण्यात.

(पाहा :वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या तरुणाची दादागिरी; पोलिसाने थेट कानशिलात लगावली)

काही दिवसांपूर्वीच दाऊद इब्राहिमचा जवळचा मानला जाणारा रियाज भाटीलाही मुंबईत अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्याच खंडणीविरोधी पथकानं ही कारवाई केली होती.

(पाहा : किरकोळ वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; तरुणांकडून दगडफेक आणि जाळपोळ)

भाटीवर नेमका काय आहे आरोप?

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या एमसीए क्लबमध्ये सदस्यत्व मिळवण्यासाठी भाटीनं मुंबईच्या विल्सन कॉलेजची बोगस कागदपत्रं बनवून घेतली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भाटीला 2013मध्ये क्लबचं सदस्यत्व मिळालं होतं.

SPECIAL REPORT : नागपुरात दिवसाढवळ्या खंडणीसाठी टपरीचालकावर हल्ला

First published: July 18, 2019, 2:27 PM IST

ताज्या बातम्या