मुंबई, 26 जून : एका महिलेनं पतीच्या क्रूर वागणुकीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करणारी महिला इन्शोरन्स सेक्टरमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून आपलं कर्तव्य बजावत होती. हा संतापजनक प्रकार मुंबईमध्ये घडला आहे. ज्योती बाला असं महिलेचं नाव असून तिचं दीड वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. ज्योती गर्भवती राहिल्यानंतर पतीनं तिच्याकडे मूल जन्माला येऊ न देण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी तो तिच्याकडे वारंवार गर्भपात करण्याचीही मागणी करत होता. पण तिला आपल्या बाळाला या जगात आणायचं होतं. या सर्व परिस्थितीविरोधात तिचा संघर्ष सुरू होता. पतीकडून वारंवार गर्भपाताच्या होणाऱ्या मागणीला कंटाळून तिनं अखेर स्वतः आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. पण जीवनयात्रा संपवण्यापूर्वी तिनं पाटण्याहून मुंबई गाठली आणि आपल्या बाळाला जन्म दिलं.
'माझ्या मुलाला न्याय द्या'
ज्योतीनं मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. ज्यामध्ये तिनं पती आणि त्याच्या कुटुंबीयांना आत्महत्येसाठी जबाबदार ठरवलं आहे. शिवाय, आपल्या मुलाला न्याय मिळावा, असेही तिनं नमूद केलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर ज्योतीच्या सासरची मंडळी फरार आहेत.
(पाहा :VIDEO: मॉब लिंचिंगवर पहिल्यांदाच बोलले PM मोदी, संसदेत म्हणाले...)
ज्योतीनं बहिणीच्या घरी घेतला गळफास
9 जून रोजी ज्योतीनं वसई येथील आपल्या बहिणीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा शहरातील रहिवासी ज्योती बालाचं नोव्हेंबर 2017मध्ये विमल वर्मासोबत लग्न झालं. ज्योती एका खासगी इन्शोरन्स कंपनीमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होती. ज्योतीच्या सुसाइड नोटच्या आधारे महाराष्ट्र पोलिसांनी विमल वर्मा, सासरे विजय वर्मा, सासू मीरा शरण आणि अन्य लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांपासून वाचण्यासाठी विमल वर्मानं ऑफिसमध्ये रजेचा अर्ज दिला आहे.
(पाहा :VIDEO: साखर झोपेत असलेल्या 4 मुलांना भरधाव कारनं चिरडलं)
वर्मा कुटुंबीयांवर गंभीर आरोप
दुसरीकडे, ज्योतीच्या कुटुंबीयांनीही वर्मा कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. लग्नाच्या काही दिवसांनंतरच ज्योतीच्या सासरच्यांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली होती. पती तिच्यासोबत साधी बोलणीदेखील करत नव्हता. गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव आणत होता, असा गंभीर आरोप ज्योतीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
सोन खरेदी महागणार, अमेरिका-इराणमधल्या तणावाचा फटका