मुंबईतला MIMचा गड शिवसेनेनं भेदला, यामिनी जाधवांनी केले वारिस पठाणांचा पराभव

मुंबईतला MIMचा गड शिवसेनेनं भेदला, यामिनी जाधवांनी केले वारिस पठाणांचा पराभव

मुंबईतील एमआयएमच्या गडाला शिवसेनेनं सुरुंग लावला आहे. शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी एमआयएमचे वारिस पठाण यांचा दणदणीत पराभव केला आहे.

  • Share this:

 मुंबई, 24 ऑक्टोबर : मुंबईतील एमआयएमच्या गडाला शिवसेनेनं सुरुंग लावला आहे. शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी एमआयएमचे वारिस पठाण यांचा दणदणीत पराभव केला आहे. भायखळा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी निकालापूर्वीच आपल्या विजयाचा दावा केला होता. 2014 साली वारिस पठाण यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली होती.  2009 पासून भायखळा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता. मात्र 2014 साली काँग्रेसचे उमेदवार मधु चव्हाण यांचा पराभव करून वारिस पठाण यांनी निवडणुकीत बाजी मारली होती.  यंदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने यामिनी जाधव यांना उमेदवारी देत या मतदारसंघात मोठं आव्हान निर्माण केलं होतं. पण मतदारांनी आपलं बहुमुल्य मत यामिनी जाधव यांच्या पारड्यात टाकलं.

(वाचा :  युवासेनाध्यक्ष आदित्य ठाकरेंचा दणदणीत विजय, अभिजित बिचुकलेंना मिळाली एवढीच मतं)

शिवसेनेने भाजपकडे मागितलं मुख्यमंत्रिपद, 50 -50 फॉर्म्युल्याची अट - सूत्रांची माहिती

दुसरीकडे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळामध्ये निम्मी मंत्रिपदं शिवसेनेला हवी आहेत. शिवसेनेने, अडीच - अडीच वर्षं मुख्यमंत्रिपदाची अट घातली आहे. महायुतीच्या सरकारमध्ये निम्म्या कालावधीसाठी शिवसेना आणि निम्म्या कालावधीसाठी भाजपचा मुख्यमंत्री असेल, असं शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे. विधानसभेच्या निकालांमध्ये भाजपला मागच्या निवडणुकीपेक्षा कमी जागा मिळाल्या. याउलट शिवसेनेचं मात्र नुकसान झालं नाही, असं चित्र आहे. यामुळेच शिवसेनेने भाजपसमोर अटीशर्ती ठेवल्या आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने आधी शिवसेनेसोबत सरकार स्थापन केलं नव्हतं. पण नंतर भाजपने शिवसेनेला सोबत घेतलं. शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा भाऊ कोण यावरून प्रत्येक निवडणुकीत स्पर्धा पाहायला मिळाली. आता पुन्हा एकदा सत्तास्थापनेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे.

(वाचा : ‘लेक निघाली सासरला’, पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मिम्स व्हायरल)

15 बंडखोरांचा भाजपला पाठींबा- मुख्यमंत्री

जनेतेनं अतिशय मोठा निर्णय दिला असून तो आम्ही मान्य करतो. सरकार स्थापनेसाठी राज्यातल्या जनतेनं आम्हाला कौल दिलाय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. मागच्या वेळेसपेक्षा काही जागा कमी असल्या तरी आमचा स्ट्राइक रेट अतिशय चांगला आहे असंही त्यांनी सांगितलंय. बंडखोरीमुळे भाजपला फटका बसला असल्याचं त्यांनी मान्य केलं. जे बंडखोर निवडून आले त्यातल्या अनेकांशी माझं बोलणं झालं असून किमान 15 लोकांनी मला पाठिंबा देण्याचं मान्य केलं असा खुलासाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. आमचं ठरलं असून त्याच प्रमाणं पुढे जाऊ असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्रिपदाबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, जे ठरलं त्यानुसारच पुढे जाऊ. आत्ताच या प्रश्नावर काहीही उत्तर देणार नाही. तुम्ही कितीही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर देणार नाही. विरोधीपक्षांनी जास्त हुरळून जाऊ नये. त्यांना फार काही करता आलं नाही. उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद ऐकली आहे, आमचं सर्व काही सुरळीत होईल असंही ते म्हणाले. युती म्हणून लढलो आणि आमची तीच भावना कायम आहे असंही ते म्हणाले. आमचे काही मंत्री पराभूत झाले ते का पराभूत झाले याचा विचार करू. उदयनराजे भोसले आणि पंकजा मुंडे यांचा पराभव धक्कादायक आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

(वाचा : कोण होणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री?आशिष शेलारांची विजयानंतरची प्रतिक्रिया)

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

विधानसभेच्या निवडणुक निकाल स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेचे आभार मानले. मात्र आभार मानतानाच भाजपलाही त्यांनी टोले लगावले. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठरलेल्या 50-50 टक्क्यांच्या फॉर्म्युल्याची आठवणही करून दिली. दोनही पक्षांचे ज्येष्ठ नेते एकत्र बसतील. पारदर्शकपणे चर्चा करतील आणि तोडगा काढतील असंही त्यांनी सांगितलं. आधी सत्तेचं वाटप ठरेल नंतरच सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. हा भाजपला इशारा नसून लोकसभेच्या वेळी जे ठरलं त्याची फक्त आठवण करून देतो असंही ते म्हणाले.

VIDEO : थेट जेसीबी घेऊन गुलाल उधाळा, काँग्रेस कार्यकर्त्यांची तुफान मिरवणूक

First published: October 24, 2019, 6:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading