मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai Election Result 2019 LIVE : विनोद तावडेंचं तिकीट कापणाऱ्या सुनील राणेंचा बोरिवलीतून दणदणीत विजय

Mumbai Election Result 2019 LIVE : विनोद तावडेंचं तिकीट कापणाऱ्या सुनील राणेंचा बोरिवलीतून दणदणीत विजय

बोरिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुनील राणे विजयी झाले आहेत.  भाजपने विनोद तावडे यांचं तिकीट कापून सुनील राणे यांना उमेदवारी जाहीर केली होती.

बोरिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुनील राणे विजयी झाले आहेत. भाजपने विनोद तावडे यांचं तिकीट कापून सुनील राणे यांना उमेदवारी जाहीर केली होती.

बोरिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुनील राणे विजयी झाले आहेत. भाजपने विनोद तावडे यांचं तिकीट कापून सुनील राणे यांना उमेदवारी जाहीर केली होती.

मुंबई, 24 ऑक्टोबर : बोरिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुनील राणे विजयी झाले आहेत. बोरिवली मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. भाजपने विनोद तावडे यांचं तिकीट कापून सुनील राणे यांना उमेदवारी जाहीर केली होती. तावडे हे बोरिवलीचे आमदार होते. तर सुनील राणे हे वरळीतील रहिवासी आहेत. पण या मतदारसंघातून युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. पूर्वी ही जागा भाजपाकडे असताना सुनील राणेंनी येथून निवडणूक लढवली होती. पण येथे त्यांना अपयश मिळालं होतं.  2014मध्ये विनोद तावडे यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली होती. 2014मध्ये शिवसेना-भाजपनं युती केलेली नव्हती. पण 2019मध्ये युती झाल्यानं याचा फायदा सुनील राणे यांना झाल्याचं म्हटलं जात आहे.

(वाचा :  साताऱ्यात उदयनराजेंना धक्का, उदयनराजेंची 'या' आमदारानं कॉपी केली स्टाईल)

तिकीट कापल्यानंतर तावडेंनी शरद पवारांशी केली होती चर्चा ?

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही तिकीट वाटप करताना भाजपने धक्कातंत्राचा अवलंब केला होता. भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यासह मंत्री विनोद तावडे आणि प्रकाश मेहता यांचं तिकीट पक्षाने कापलं होतं. भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली होती. कारण तावडेंनी शरद पवारांसोबत चर्चा केल्याचे वृत्त समोर आलं होतं.

(वाचा : होमग्राऊंडवरचा पराभव शिवसेनेला झोंबला, तृप्ती सावंत यांना पोलीस सुरक्षा!)

'भाजपनं मला तिकीट का दिलं नाही याचा मी विचार करत आहे. भाजपने माझं तिकीट कापल्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केल्याचं बोललं जातंय. मात्र या सगळ्या अफवा आहेत. मी पवारांशी चर्चा केली वगैरे यात काही तथ्य नाही,' अशी भूमिका स्पष्ट करत तावडेंनी पक्षांतराच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या.

(वाचा :  राज ठाकरेंना मोठा धक्का, मनसेचं 'इंजिन' यार्डातच!)

2014 ची विधानसभेची परिस्थिती

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. शिवसेनेला 63 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

एकूण जागा - 288

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. या वेळी हा फॅक्टर फडणवीस सरकारसाठी किती महत्त्वाचा ठरतो हे कळेल. राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावल्यानंतर भाजप-सेना युतीचं सरकार आलं होतं. गेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं. या वर्षी निवडणुकीपूर्वीच युती आणि आघाडी झाल्याने कुठल्याच पक्षाने सर्वच्या सर्व जागा लढवल्या नाहीत. सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष आश्चर्यकारकरीत्या बहुजन समाज पार्टी हा राहिला.

अजितदादांच्या जल्लोषात पत्नी सुनेत्रा पवार सहभागी,कुटुंबावर टीकाकारांना सुनावले

First published:

Tags: BJP, Borivali s13a152, Maharashtra Assembly Election 2019, Shiv Sena (Political Party), Vinod tawade