Mumbai Election Result 2019 : कोण होणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री? भाजपच्या आशिष शेलार यांची विजयानंतरची पहिली प्रतिक्रिया

Mumbai Election Result 2019 : कोण होणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री? भाजपच्या आशिष शेलार यांची विजयानंतरची पहिली प्रतिक्रिया

महायुतीचे उमेदवार आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांचा 26 हजार 507 मतांनी विजय झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : महायुतीचे उमेदवार आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांचा 26 हजार 469 मतांनी विजय झाला आहे. वांद्रे पश्चिम मतदारसंघातून हा त्यांचा सलग दुसरा विजय आहे. विजयानंतर आशिष शेलार यांनी न्यूज 18 लोकमतसोबत संवाद साधला. आशिष शेलार म्हणाले की, 'ज्याठिकाणी आम्ही हरलो तेथे आत्मपरिक्षणाची गरज आहे. मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण हे भाजपची संसदीय समिती आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चर्चा करून ठरवतील. पण हा युतीचा विजय आहे. मला मिळालेलं मताधिक्य हे खूप आहे. कारण यंदा मतदानाचा टक्का जरी घसरलेला असला तरीही मला 2014एवढंच मताधिक्य मला मिळालं आहे'.

(वाचा : मातोश्रीच्या अंगणात सेनेचा पराभव; महापौरांना बंडखोरीचा फटका)

तर दुसरीकडे, शिवसेनाप्रमुखांचं निवासस्थान ज्या विधानसभा मतदारसंघात येतं, तिथूनच शिवसेनेला पराभवाला सामोरं जावं लागलं. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा वांद्रे पूर्व या मतदारसंघातून पराभव झाला आहे. काँग्रेसच्या झिशांत सिद्दीकी यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवाला शिवसेनेतलीच बंडखोरी जबाबदार असल्याचं स्पष्ट होत आहे. या मतदारसंघातून सेनेच्या तृप्ती सावंत इच्छुक होत्या. पण महाडेश्वरांना तिकीट मिळाल्याने तृप्ती यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या अगदी 2 दिवस आधीच शिवसेनेनं तृप्ती सावंत यांची पक्षातून हकालपट्टी केली. या सगळ्याचा फटका सेनेला बसला आणि अंगणातच त्यांचा पराभव झाला. झिशांत सिद्दीकी यांनी त्यांचा पराभव केला.

(वाचा :  कल्याणमध्ये धावलं मनसेचं इंजिन, 'ही' आहेत विजयाची समीकरणं)

पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे तृप्ती सावंत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचं सेनेनं सांगितलं. मुंबईच्या वांद्रे पूर्व विभागातून तृप्ती सावंत यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचं सामानाच्या मुखपत्रातून जाहीर करण्यात आलं. तृप्ती सावंत यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि निकटवर्तीयांमध्ये नाराजीचा सूर होता. तृप्ती सावंत या दिवंगत बाळा सावंत यांच्या पत्नी असून त्या विद्यमान आमदार होत्या. 2015 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये तृप्ती यांनी ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा पराभव केला होता. पण यंदा त्यांना उमेदवारी नाकरण्यात आली.

(वाचा :  विनोद तावडेंचं तिकीट कापणाऱ्या सुनील राणेंचा बोरिवलीतून दणदणीत विजय)

VIDEO : पंकजा मुंडेंच्या पराभवावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

First published: October 24, 2019, 5:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading