मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Nawab Malik: मंत्री नवाब मलिक यांना धमकीचा फोन, जीवे मारण्याची धमकी

Nawab Malik: मंत्री नवाब मलिक यांना धमकीचा फोन, जीवे मारण्याची धमकी

मंत्री नवाब मलिक यांना धमकीचा फोन, जीवे मारण्याची धमकी

मंत्री नवाब मलिक यांना धमकीचा फोन, जीवे मारण्याची धमकी

Nawab Malik: गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक हे सातत्याने एनसीबीवर आरोप करत आहेत.

मुंबई, 22 ऑक्टोबर : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना जीवे मारण्याची धमकी (threat call) मिळाली आहे. एका निनावी फोन कॉलने त्यांना धमकी देण्यात आल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक यांनी दावा केला आहे की, त्यांना धमकीचा फोन कॉल राजस्थानमधून (Nawab Malik received threat call from Rajasthan) आला होता. समीर वानखेडे हे चांगले काम करत आहेत त्यांच्या कामात अडथळा आणू नका आणि टार्गेट करु नका असंही धमकावणाऱ्याने म्हटल्यांचं बोललं जात आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. बॉलिवूडमधून समोर आलेलं ड्रग्ज कनेक्शन तसेच मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईवर नवाब मलिक एनसीबीवर सातत्याने आरोप करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक पत्रकार परिषद घेत एनसीबीवर गंभीर आरोप करत आहेत. तसेच एनसीबीचे झोनल चीफ समीनर वानखेडे आणि त्याच्या परिवारावर सुद्धा नवाब मलिक आरोप करत आहेत. समीर वानखडेंचे दुबईतील फोटो नवाब मलिकांनी केले ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिका आणि एनसीबी अधिकारी समीर वानखडेंचे दुबईतील हॉटेलमधील फोटो काल (21 ऑक्टोबर 2021) ट्विट केले. आपण दुबईला गेलोच नव्हतो, असा दावा समीर वानखडेंनी केला होता. हा दावा खोटा असल्याचं सांगत नवाब मलिक यांनी समीर वानखडे दुबईतील हॉटेलमध्ये बसल्याचे काही फोटो ट्विट केले आहेत. नवाब मलिक विरुद्ध समीर वानखडे या वादाची मालिका अजूनही सुरूच असल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. मलिक विरुद्ध वानखडे क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एका व्हॉट्सअप मेसेजच्या आधारे समीर वानखडेनं बोगस कारवाई केल्याचा आरोप नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. एका दौऱ्याच्या वेळी वानखडे दुबईला गेल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. हा आरोप फेटाळून लावत आपण दुबईला गेलोच नसल्याचं वानखडेंनी म्हटलं होतं. त्यानंतर नवाब मलिक यांनी काही फोटो ट्विट केले. अखेर समीर वानखेडेंनी दिलं स्पष्टीकरण नवाब मलिकांनी केलेल्या आरोपानंतर NCB अधिकारी समीर वानखेडे यांनी काल (21 ऑक्टोबर 2021) सायंकाळी पत्रकार परिषद घेत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. गेल्या 15 दिवसांपासून माझ्या मृत आईवर, रिटायर्ड वडिलांवर आणि बहिणीवर नजर ठेवली जात आहे. माझ्या कुटुंबावर घाण शब्द आणि वैयक्तिक आरोप केले जात असून त्याचे मी खंडण करतो. यापुढे ते म्हणाले की, मी माझं काम करतोय, देशाची सेवा आणि ड्रग्सवर कारवाई करतोय यासाठी मला तुरुंगात टाकणार असाल तर मी तयार आहे.
First published:

Tags: Mumbai, Nawab malik, Rajasthan

पुढील बातम्या