मुंबई, 26 ऑक्टोबर : मुंबईत क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकऱणात (Mumbai drugs case) एनसीबी (NCB)कडून करण्यात आलेल्या कारवाईवर नवाब मलिक (Nawab Malik) प्रश्न उपस्थित करत आहेत. एनसीबीकडून करण्यात आलेल्या कारवाईंपैकी अनेक कारवाया या बनावट असल्याचं सांगत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी बनावट जात प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा दावाही मलिकांनी केला आहे. नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांदरम्यान आता मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे.
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक फोटो ट्विट केला आहे. हा फोटो कट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी पेहचान कौन? असा सवालही केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी हे ट्विट करत नवाब मलिकांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याचं बोललं जात आहे.
मलिकांचा पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट
नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत गौप्यस्फोट केला आहे. यासोबतच एनसीबी (NCB) अधिकारी सचिन वानखेडे (Sachin Wankhede) यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे. या व्यक्तीने बनावट जात प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवली, एस सी सर्टीफिकेट मिळवले. जे जन्म प्रमाणपत्र आम्ही ट्विट केलं आहे ते खरं आहे. तो जन्म दाखला खरा आहे... ज्या जन्म प्रमाणपत्रावर समीर दाऊद वानखेडे नाव आहे. मी दिलेल्या माहितीवर ठाम आहे. पूर्ण परिवार मुस्लिम म्हणुन जगत आहेत, हे सत्य आहे. दलित संघटनांबरोबर आम्ही बोलत आहोत. या बाबतीत दलित संघटना तक्रार करतील. अनेक लोक तक्रार करणार आहेत. सत्य देशासमोर येईल. जातवैधता समितीसमोर समीर वानखेडे यांचा दाखला पाठवणार आहोत असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
26 प्रकरणांतून फसवणूक
नवाब मलिकांनी म्हटलं, आज मी एक पत्र ट्विट केले आहे. हे पत्र एनसीबीतील एका अधिकाऱ्याने पाठवले, नाव गुप्त आहे. हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना पाठवले आहे. 26 प्रकरणांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. 26 प्रकरणांत कशी फसवणूक झाली याची माहिती पत्रात आहे. या पत्रात असं आहे की लोकांना यामध्ये अडकवले जात आहे, खोट्या केस बनवल्या जात आहे असं उल्लेख आहे. एनसीबीने आता चौकशी बसवली आहे, या गोष्टींचा सुद्धा चौकशी करावी. या पत्राबाबत सुद्धा चौकशी करण्यात यावी. वसुली करण्यात आली आहे. एनसीबीमध्ये चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे, त्याची चौकशी करावी.
इतर पुरावे हळूहळू बाहेर काढणार
पत्रात ज्या प्रकारे उल्लेख आहे त्या प्रमाणे हे सगळं आहे. माझ्याकडे अजून एक व्यक्ती आली आहे त्यांनी असं सांगितले की, त्यांच्याकडून 50 कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या आणि नायजेरियन व्यक्तीला अडकवले गेले. मी बहीण, पत्नी, वडील यांच्याबद्दल कधीच द्वेष ठेवत नाही. जर हा जन्म दाखला खोटा असेल तर खरा जन्म दाखला दाखवा. वानखेडेंनी धर्मपरिवर्तन केलं नाही तर खरा दाखला समोर आणावा. माझ्याकडे अजूनही काही कागदपत्रे आहेत ती हळू हळू बाहेर काढेन.
आमच्याकडे सगळे पुरावे आहेत त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. माझे प्रश्न समीर वानखेडे यांच्या बाबतीत आहे. क्रांती रेडकर बाबात मला जास्त खोलात जायचे नाहीये. सत्य समोर आणण्यासाठी काही गोष्टी समोर आणाव्या लागत आहेत असंही नवाब मलिक म्हणाले.
बेकायदा फोन टॅपिंग
समीर वानखेडे यांनी कोणत्या कारणास्तव माझ्या मुलीचा सीडीआर मागितला आहे? वानखेडे स्वत:च्या सीमा पार करत आहेत. समीर वानखेडे फोन टॅप करत आहेत एक मुंबईत आणि ठाण्यातून फोन टॅप केला जात आहे. माझ्या मुलीचा सीडीआर मुंबई पोलिसांकडे मागितला... पण तो पोलिसांनी दिला नाही. आता ही लढाई सुरू राहील. कोणत्या अधिकारात वानखेडे माझ्या मुलीची खासगी माहिती मागत आहेत? एनसीबी डिपार्टमेंटला नवाब मलिकचा फोबीया झालाय का ? आमची लढाई एनसीबी संस्थेशी नाहीये. मिस्टर दाऊन वानखेडे माझ्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोका मी तुम्हाला आव्हान देतो असंही नवाब मलिकांनी म्हटलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jitendra awhad, Nawab malik, NCB