गिरीश महाजन राजू शेट्टींच्या भेटीला

गिरीश महाजन राजू शेट्टींच्या भेटीला

मुंबईत गिरीश महाजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची भेट घेऊन दूध आंदोलनावर तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा करणार आहे.

  • Share this:

मुंबई,18 जुलै : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या दूध आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची एंट्री झालीये. मुंबईत गिरीश महाजन यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची भेट घेणार आहे. राजू शेट्टी यांची भेट घेऊन दूध आंदोलनावर तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा करणार आहे. मुंबईतल्या शासकीय गेस्ट हाऊसमध्ये ही भेट होत आहे.

बैठकीत राजू शेट्टी ची भूमिका समजून घेणार आहेत. तर उद्या गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यातील प्रमुख दूध संघाची 12 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत राजू शेट्टी यांची भूमिका मांडणार आहे. या बैठकीनंतर बैठकीत मुख्यमंत्री निर्णय घेणार आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारलेलं दूध आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. राज्यातील दूध पट्ट्यात या आंदोलनाची तीव्र पडसाद आजही उमटले. कालपासून गुजरात सीमेवर राजू शेट्टी ठान मांडून आहेत. तर शिरोळ्यात आंदोलनकांनी दूधाचा टँकर पेटवण्यात आला. सांगलीत दूध टँकरसह दोन बसही फोडण्यात आल्या.  तर तिकडे कर्नाटकातून येणाऱ्या दूधाला पोलीस संरक्षण देण्यात आलंय.

मुंबईत येणाऱ्या दूधाच्या टँकरला आंदोलकांनी मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर लक्ष्य करण्यात आलं. बुलडाण्यात मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्यात आला. तर पंढरपुरात दूध केंद्राची तोडफोड करण्यात आली. सर्वत्र हिंसक वळण मिळत असताना नगरमध्ये मात्र आंदोलकांनी मोफक दूध वाटप केलं.

दूध आंदोलनावर तोडगा कोण काढणार?, गडकरी की फडणवीस ?

मनसेची उडी

दूध आंदोलनात आता मनसे कार्यकर्त्यांनीही उडी घेतलीय. राज्यातल्या शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या दूध आंदोलनाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पाठिंबा दिला. यानंतर मग मनसे कार्यकर्त्यांनी सक्रीयपणे या आंदोलनात उडी घेतली. राजू शेट्टींना पाठिंबा देण्यासाठी मनसे कार्यकर्ते पालघरमध्ये दाखल झालेत. पालघर इथं असलेल्या वसुधरा डेअरीच्या गेटवर हे कार्यकर्ते दाखल झालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2018 11:12 PM IST

ताज्या बातम्या