मुंबई, 30 जून: गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात विविध घडामोडी होताना दिसत आहेत. कालपासून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राजकीय नेत्यांच्या बैठका (Political leaders meeting) पार पडत असल्याचं दिसून येत आहे. काल शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची (Sharad Pawar meet with CM) भेट घेतली त्यानंतर आता आज महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या नेत्यांची बैठक पार पडली.
वर्षा निवासस्थानावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवारांसह (DYCM Ajit Pawar) नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil), महसूल मंत्री बाळासाहेब तोरात उपस्थित होते. या बैठकीत आगामी पावसाळी अधिवेशनच्या संदर्भात रणनिती तसेच विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झालीच. यासोबतच इतरही विषयांवर चर्चा झाली.
सोलापुरात गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक
बैठकीत काय काय झालं?
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये विरोधकांनी अजित पवार आणि अनिल परबांच्या विरोधात दिलेल्या पत्राबाबत चर्चा झाली. विरोधी पक्ष सरकारला बदनाम करत असल्याचा सूर बैठकीत सर्व नेत्यांचा होता. अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर केंद्राकडून कारवाईसाठी भाजप दबाव आणत असल्याची चर्चा सुद्धा झाली.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या संदर्भातही बैठकीत चर्चा झाली. महाविकास आघाडी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अनुकूल असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. मात्र, असे असले तरी दगाफटका होऊ नये यासाठी सत्ताधाऱ्यांकडून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Uddhav thackeray