News18 Lokmat

ईशान्य मुंबईतील रणनीतीसाठी मातोश्रीवर मॅरेथॉन बैठक सुरू

ईशान्य मुंबई मतदारसंघातील निवडणूक रणनीतीवर या बैठकीत चर्चा होत असल्याची माहिती आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 01:36 PM IST

ईशान्य मुंबईतील रणनीतीसाठी मातोश्रीवर मॅरेथॉन बैठक सुरू

मुंबई, 22 एप्रिल : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर ईशान्य मुंबईतील शिवसेनेच्या सर्व 60 पदाधिकार्यांची बैठक घेण्यात येत आहे. भाजपचे कोकण समन्वयक आमदार प्रसाद लाड आणि मंत्री प्रकाश मेहताही या बैठकीला उपस्थित आहेत.

ईशान्य मुंबई मतदारसंघातील निवडणूक रणनीतीवर या बैठकीत चर्चा होत असल्याची माहिती आहे. या मतदारसंघात शिवसैनिकांचा भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना विरोध होता. त्यानंतर सोमय्या यांचा पत्ता कट करत भाजपने मनोज कोटक यांना उमेदवारी दिली.

गेल्या पाच वर्षात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये या मतदारसंघात दरी निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दगाफटका होऊ नये, म्हणून ही बैठक घेतली जात असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ईशान्य मुंबई आणि शिवसेना-भाजप

शिवसैनिकांच्या कट्टर विरोधापुढे अखेर भाजपने नमत घेतं ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या यांचा पत्ता कापला आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीत ईशान्य-मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Loading...

भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप आणि टीका केली होती. त्यामुळे शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला होता

. तसंचईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसैनिकांनी 'एकच स्पीरीट नो किरीट' असा नाराही दिला होता. उमेदवारी मिळवण्यासाठी किरीट सोमय्यांनी मातोश्रीवर जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, 'मातोश्री'वरुन सोमय्या यांची भेट नाकारली. त्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे प्रसाद लाड यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती पण कोणताही तोडगा निघाला नाही. अखेर भाजपने युतीचा धर्म पाळत किरीट सोमय्यांना उमेदवारी नाकारली.


VIDEO: प्रचाराच्या शेवटच्या दिवशी 2 पक्षांचे कार्यकर्ते भिडले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 01:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...