राहुल गांधींबाबत नेमकं काय वक्तव्य केलं? शरद पवारांनी केला नवा खुलासा

राहुल गांधींबाबत नेमकं काय वक्तव्य केलं? शरद पवारांनी केला नवा खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर देशभरात मोठी चर्चा झाली. पण आता त्या वक्तव्याबाबत शरद पवार यांनी खुलासा केला आहे.

  • Share this:

मुंबई, 29 एप्रिल : 'ममता बॅनर्जी, एन. चंद्राबाबू नायडू आणि मायावती हे पंतप्रधानपदाचे चांगले दावेदार ठरू शकतात,' या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर देशभरात मोठी चर्चा झाली. पण आता त्या वक्तव्याबाबत शरद पवार यांनी खुलासा केला आहे.

'राहुल गांधी यांच्याशिवाय तुमच्याकडे पंतप्रधानपदाचा कुणीही उमेदवार नाही का? असा प्रश्न मला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना इतर तीन नावं सांगत मी म्हणालो की, आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. पण माध्यमांनी अप्रगल्भता दाखवत माझं वक्तव्य वेगळ्या अर्थाने दाखवलं,' असा खुलासा शरद पवार यांनी केला होता.

काय आहे प्रकरण?

शरद पवार यांनी एका राष्ट्रीय वाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. त्यामध्ये पवारांना पंतप्रधानपदाबाबत विचारला असता ते म्हणाले की, 'ममता बॅनर्जी, एन. चंद्राबाबू नायडू, मायावती आणि राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे चांगले दावेदार ठरू शकतात.' यामध्ये पवारांनी राहुल गांधींपेक्षा इतर तीन नावे पंतप्रधानपदासाठी अधिक प्रभावी ठरु शकतात, असं म्हटल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यामुळे देशभरात मोठी चर्चाही झाली.

याच मुलाखतीत शरद पवार यांनी निवडणुकीनंतर तयार होणाऱ्या परिस्थितीवरही भाष्य केलं होतं. ते म्हणाले की, निवडणूक निकालानंतर आम्ही एका समान अजेंड्यावर एकत्र येऊन देशाला नवा पर्याय देण्याचा प्रयत्न करू. एनडीएतीलही काही पक्ष आघाडीत येतील, याबाबतचे संकेत शरद पवारांनी दिले आहेत.

SPECIAL REPORT: राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत?

First published: April 29, 2019, 9:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading