राज ठाकरेंबाबत प्रश्न विचारताच संजय निरुपम म्हणाले...

राज ठाकरेंबाबत प्रश्न विचारताच संजय निरुपम म्हणाले...

संजय निरुपम आणि राज ठाकरे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे.

  • Share this:

मुंबई, 26 एप्रिल : मुंबईतील काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. राज ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर निरुपम म्हणाले की, 'जे मोदी आणि शहा यांच्या विरोधात पुढे आले त्यांचं स्वागत आहे.'

संजय निरुपम आणि राज ठाकरे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. या पार्श्वभूमीवर निरुपमांनी राज ठाकरेंचे आभार मानल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

संजय निरुपम यांनी राहुल गांधींचा मुंबईतील रोड शो रद्द होण्याबाबतही भाष्य केलं आहे. 'राहुल गांधी यावे ही आमची इच्छा होती. मात्र गेल्या महिन्यातच त्यांनी मुंबईत येवून मुंबईकरांना संबोधित केले होते. आता त्यांचे विचार आम्ही घराघरात पोहचवतो. मला वाटत नाही की कुठे मतभेत आहे म्हणून राहूल गांधी आले नाहीत.'

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या सभांच्या माध्यमातून सरकारवर हल्लाबोल करत आहोत. आम्ही सत्य दाखून या मोदी सरकारची पोलखोल करत आहोत, असा दावा मनसेकडून करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आज होणाऱ्या शेवटच्या जाहीर सभेत राज ठाकरे मोठी पोलखोल करतील, असे संकेत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून दिले आहेत.

'आज नाशिकच्या सभेत पोलखोलचा ग्रँड फिनाले', असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे नेमकं कोणत्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल करतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.


VIDEO: पार्थ पवार आणि बारणेंच्या लढतीत 'या' अपक्ष उमेदवाराने वेधून घेतलं सर्वांचंच लक्षबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 02:44 PM IST

ताज्या बातम्या