मुंबई, 17 एप्रिल : दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारात वडाळा विधानसभेचे काँग्रेसचे आमदार कालीदास कोळंबकर सामील झालेले पाहायला मिळाले. कालीदास कोळंबकर ऐन निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेंसोबत प्रचारात दिसल्यामुळे याच मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड मोठा धक्का बसला आहे.
दक्षिण-मध्य मुंबईत काँग्रेसचे फक्त दोनच आमदार आहेत. त्यापैकी एक आमदार महायुतीसोबत प्रचारात सहभागी झाल्यामुळे काँग्रेस अडचणीत आल्याचं चित्र आहे. वडाळा येथील जनसंपर्क कार्यालयात कालीदास कोळंबकर यांनी महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचे स्वागत केलं आहे.
दरम्यान, कालीदास कोळंबकर हे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. कारण त्यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या संपर्क कार्यालयात मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पोस्टर लावलं आहे.
मुंबईत कशा आहेत लोकसभा लढती?
मुंबई उत्तर
भाजप – गोपाळ शेट्टी
काँग्रेस – ऊर्मिला मातोंडकर
मुंबई उत्तर पश्चिम
शिवसेना – गजानन कीर्तिकर
काँग्रेस – संजय निरुपम
मुंबई उत्तर पूर्व
भाजप – मनोज कोटक
राष्ट्रवादी – संजय दीना पाटील
व्हीबीए – संभाजी शिवाजी काशीद
मुंबई उत्तर मध्य
भाजप – पूनम महाजन
काँग्रेस – प्रिया दत्त
मुंबई दक्षिण मध्य
शिवसेना – राहुल शेवाळे
काँग्रेस – एकनाथ गायकवाड
व्हीबीए – डॉ. संजय भोसले
मुंबई दक्षिण
शिवसेना – अरविंद सावंत
काँग्रेस – मिलिंद देवरा
व्हीबीए – डॉ. अनिल कुमार
VIDEO : चिक्की घोटाळ्याच्या आरोपानंतर पंकजांचा पलटवार, धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप