• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • 'निर्बंध आणखी कठोर करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना'; Mumbai Police आयुक्तांकडून नागरिकांना ALERT

'निर्बंध आणखी कठोर करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना'; Mumbai Police आयुक्तांकडून नागरिकांना ALERT

Mumbai CP Hemant Nagrale PC: मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेत नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

  • Share this:
मुंबई, 16 एप्रिल : कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 'ब्रेक द चेन' (Break The Chain) अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहेत. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असतानाही मुंबईसह अनेक ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचं पाहून आता आणखी कठोर निर्बंध (Strict restrictions) लागू करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai Police Commissioner Hemant Nagrale) यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली आहे. आणखी कठोर निर्बंध लावण्याच्या सूचना मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले, राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन सुरु झाला आहे. अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. मागच्या वेळी वाहतुक सेवा बंद करण्यात आल्या होत्या. पण अजून सुद्धा काही जण या सूचनांचा विचार न करता बाहेर घराबाहेर पडत आहेत. यामुळेच आता निर्बंध अजून कठोर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत. तशा सूचना स्थानिक पोलिसांना देण्यात आल्या आहेत. कडक पावलं उचलण्याची वेळ येऊ देऊ नका पोलीसांना संयमाने काम करण्याच्या सूचना आहेत. पण त्यांना कडक पावलं उचलण्याची वेळ येऊ देऊ नका. नागरिकांनी नियमांचे पालन करा आणि पोलिसांना सहकार्य करा असेही मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी म्हटलं आहे. पोलीस आयुक्तांचं जनतेला खास आवाहन मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले, "आपल्याकडे मर्यादित पोलीस फोर्स आहेत. रात्रंदिवस पोलीस काम करत आहेत. माझं जनतेला आवाहन आहे की तुमच्याकडून जी मदत असेल ती पोलिसांना द्या. पाणी, चहा, शक्य झालं तर काही खायला द्या. पोलिसांकडे डब्बे आहेत पण सामाजिक भावनेच्या जाणिवेतून तुम्ही त्यांना पाठबळ द्या" हेमंत नगराळे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे १५ दिवसांचा लॉकडाऊन सुरु झाला आहे अत्यावश्यक सेवा सुरु आहेत रहदारीची सगळी साधने सुरु आहेत मागच्या वेळी वाहतुक सेवा बंद करण्यात आल्या होत्या सरकारची भूमिका आहे का नागरिकांनी आपली जबबादारी ओळखून वागावे कोरोनाचं मोठं संक्रमण सध्या सुरु आहे फक्त सरकारने सांगून नाही तर स्वत:ची काळजी घेवून वागणे आवश्यक आहेत शासनातर्फे सगळ्या सूचना दिल्या जात आहेत शासनाने परिपूर्ण सूचना दिलेल्या आहेत आमचे अधिकारी व्यापारी, संस्था, प्रतिष्ठित नागरिक यांच्या संपर्कात आहेत पण अजून सुद्धा काही जण या सूचनांचा विचार न करता बाहेर घराबाहेर पडत आहेत पोलीस सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत, नाकाबंदी, वाहतूकीच्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत गेल्या वर्षी 8 हजांरांवर कर्मचारी आणि अधिकारी संक्रमित होतो. या वर्षी 541 संक्रमित आहेत कोरोनामुळे गेल्या वर्षभरात 102 पोलीस दलातील जण मृत्युमुखी पडले आहेत आपल्याकडे मर्यादित पोलीस फोर्स आहेत. रात्रंदिवस पोलीस काम करत आहेत माझं जनतेला आवाहन आहे की तुमच्याकडून जी मदत असेल ती पोलिसांना द्या. पाणी, चहा, शक्य झालं तर काही खायला द्या. पोलिसांकडे डब्बे आहेत पण सामाजिक भावनेच्या जाणिवेतून तुम्ही त्यांना पाठबळ द्या पोलीसांना संयमाने काम करण्याच्या सूचना आहेत. पण त्यांना कडक पाऊलं उचलण्याची वेळ येऊ देऊ नका
First published: