maharashtra lockdown : अखेर राज्यात लॉकडाऊन लागू, ठाकरे सरकारची घोषणा

maharashtra lockdown : अखेर राज्यात लॉकडाऊन लागू, ठाकरे सरकारची घोषणा

राज्यात 22 एप्रिल रात्री 8 वाजेपासून कडक लॉकडाऊन लागू झाला आहे. त्याबद्दल नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल : राज्यात कोरोनाची (Corona) परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे आधीच कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने कडक लॉकडाऊनची (maharashtra lockdown) तयारी सुद्धा केली आहे. त्यानुसार आता राज्यात 22 एप्रिल रात्री 8 वाजेपासून कडक लॉकडाऊन लागू झाला आहे. त्याबद्दल नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लावावा अशी चर्चा या बैठकीत झाली होती. त्यानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज याबद्दल निर्णय जाहीर करणार होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय निवडा, असा सल्ला दिला होता. परंतु, राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाऊनचाा पर्याय निवडण्यात आला आहे. 1 मेपर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन असणार आहे.

राज्य सरकारकडून राज्यात 1 मेपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्याअंतर्गत असलेली वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास आता करता येणार नाही.

एकीकडे ऑक्सिजनअभावी जातोय रुग्णांचा जीव; ही व्यक्ती मात्र ठरतेय मोठा आधार

मुंबईतील लोकल सेवा पुन्हा एकदा अत्यावश्यक सेवा म्हणून चालवली जाणार आहे. सरकारी कर्मचारी, डॉक्टर नर्सेस, अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांना पास दाखवून रेल्वे नेला प्रवासाला परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्व सामान्यांना लोकलने प्रवास करता येणार नाही.

लग्न समारंभ सोहळ्यांना फक्त दोन तासांची मर्याद लोकांच्या उपस्थितीत परवागनी देण्यात आली आहे. फक्त 25 जण लग्न सोहळ्याला उपस्थितीत राहू शकता.

दरम्यान, कोविड-19 चा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत, जे 1 मे 2021 च्या सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील. परंतु, महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल केले आहेत.  हे बदल 20 एप्रिल संध्याकाळी 8 वाजेपासून 1 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत अस्तित्वात राहील.

अशी आहे नवीन नियमावली  (यावेळेत फक्त ही दुकाने सुरू राहणार आहेत)

१) किराणा दुकाने- सकाळी 7 ते 11

२) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री- सकाळी 7 ते 11

३) भाजीपाला विक्री- सकाळी 7 ते 11

4) फळे विक्री- सकाळी 7 ते 11

5)अंडी,मटण, चिकन,मासे विक्री- सकाळी 7 ते 11

6) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने- सकाळी 7 ते 11

7) पशूखाद्य विक्री- सकाळी 7 ते 11

8)बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने -सकाळी 7 ते 11

9)पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने- सकाळी 7 ते 11

10)येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने-

सकाळी 7 ते 11

Published by: sachin Salve
First published: April 21, 2021, 10:01 PM IST

ताज्या बातम्या