मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Maharashtra Night Curfew : लोकलपासून ते बसपर्यंत असे असणार बदल, राज्य सरकारकडून निर्बंध जाहीर

Maharashtra Night Curfew : लोकलपासून ते बसपर्यंत असे असणार बदल, राज्य सरकारकडून निर्बंध जाहीर

सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास 500 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास 500 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास 500 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

मुंबई, 04 एप्रिल : राज्यात कोरोनाचा(Corona virus) संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध (Maharashtra Night Curfewलागू करण्यात आले आहे. शनिवारी आणि रविवारी दोन दिवस कडक लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत सुद्धा बदल करण्यात आले आहे.

राज्यात  30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल सर्वच मंत्र्यांनी लॉकडाऊन ( Weekend Lockdown) न लागू करण्याचा सूर लगावला होता. त्यामुळे मध्यरात्रीपासून कडक निर्बंधाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होणार आहे. महापालिका, एसटी महामंडळ आणि खासगी बसेसमधून प्रवास करण्यास मर्यादा घालण्यात आली आहे. बसमध्ये आता उभ्याने प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. बसमध्ये असलेली आसन व्यवस्थेनुसार, प्रवाशांना प्रवेश करण्यात मुभा देण्यात येणार आहे.

मुंबईत लोकलमध्ये आसनक्षमतेनुसार प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर रिक्षामध्ये फक्त दोन प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. सरकारी आणि खासगी बसमध्ये आसनक्षमतेनुसार प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे.

पश्चिम बंगाल निवडणुकीत मिथुन चक्रवर्ती आणि जया बच्चन आमने-सामने

राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास 500 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

शासकीय कार्यालयं 50 टक्के क्षमतेनं सुरू राहणार आहे.  धार्मिक स्थळावर देखील काही बंधन घालण्यात आल आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील सर्व कामं सुरू राहणार आहे.

राज्यात कडक निर्बंध लागू, शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन

त्याचबरोबर बार, हॉटेल, मॉल्स बंद राहणार आहे. हॉटेल आणि रेस्टारंट आणि बार हे बंद जरी असले तरी होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे.  रेस्टॉरंट्सना फक्त टेक टू आणि पार्सल सेवांसाठी परवानगी आहे.

नाट्यगृह, सिनेमागृह सुद्धा बंद राहणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सोडून रात्री 8 ते सकाळी 6 पर्यंत सर्व काही बंद ठेवण्यात येणार आहे.  शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत राज्यात संपूर्ण लॉकडाउन असणार आहे.

First published: