जीएसटी विधेयक विशेष अधिवेशनात सादर

जीएसटी विधेयक विशेष अधिवेशनात सादर

जीएसटी विधेयक आज (शनिवारी) राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात सादर करण्यात आलंय.

  • Share this:

20 मे : जीएसटी विधेयक आज (शनिवारी) राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात सादर करण्यात आलंय. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे विधेयक मांडलं.

जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. सलग तीन दिवस हे अधिवेशन चालणार आहे. पण जीएसटी पेक्षाही या अधिवेशनावर शेतकरी कर्जमुक्तीचे पडसाद उमटणार हे नक्की आहे. कारण विरोधकांनीच यासंबंधीचे स्पष्ट संकेत दिलेत. पण सरकारमध्ये सत्तेत सहभागी असलेली सेना सुध्दा जीएसटीच्या मुद्यावर आक्रमक झालेली बघायला मिळतेय.शिवसेना या अधिवेशनात नेमकी काय भूमिका घेतेय याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

तर दुसरीकडे याच विशेष अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा करण्याची मागणी यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2017 12:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading