मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /विधिमंडळ अधिवेशन आज 'या' मुद्द्यांवर गाजणार?

विधिमंडळ अधिवेशन आज 'या' मुद्द्यांवर गाजणार?

विधानसभेत काँग्रेस अर्थसंकल्प मंजुरी देताना चर्चा करताना काय भूमिका घेते याकडे लक्ष आहे.

विधानसभेत काँग्रेस अर्थसंकल्प मंजुरी देताना चर्चा करताना काय भूमिका घेते याकडे लक्ष आहे.

विधानसभेत काँग्रेस अर्थसंकल्प मंजुरी देताना चर्चा करताना काय भूमिका घेते याकडे लक्ष आहे.

मुंबई, 9 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (maharashtra budget session 2021) आज 9 वा दिवस आहे. विधानसभेचा आजचा दिवस गाजणार आहे विरोधी पक्ष नेते यांच्या अंतिम आठवडा प्रस्ताव यावर. विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्यातील शेतकरी (Farmers) दयनीय अवस्था, सरकारची फसवी कर्जमाफी (maharashtra government yojana), अवकाळी पाऊस पीकनुकसान आणि सरकारने जाहीर केलेली अपुरी मदत यावर अंतिम आठवडा आहे. देवेंद्र फडणवीस हे सरकारची पोलखोल करतील, तसच २९२ अन्वये कायदा सुव्यवस्था, मुंबईसह शहरी भागात रखडलेले मेट्रो प्रकल्प (Metro Project)यावर चर्चा आज विधिमंडळात होणे अपेक्षित आहे.

अर्थसंकल्प वित्त मंत्री अजित पवार यांनी मांडला त्यावर आज विधिमंडळात चर्चा देखील होणार आहे. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर विरोधक तर तोंडसुख घेतीलच त्याच वेळी महाविकास आघाडीतील मित्र पक्ष काँग्रेस पक्षाने गॅस डिझेल दरवाढ यावर सवलत न दिल्याने नाराजी व्यक्त केली, विधानसभेत काँग्रेस अर्थसंकल्प मंजुरी देताना चर्चा करताना काय भूमिका घेते याकडे लक्ष आहे.

दोन दिवस पुरतील एवढेच कोरोना लशीचे डोस शिल्लक, मनपाला प्रतीक्षा पुढील साठ्याची

विधानसभा अध्यक्ष निवडणूक याबाबत आज निर्णय अपेक्षित आहे. निवडणूक घेण्यास काँग्रेस आग्रही तर राष्ट्रवादी, शिवसेना यांची त्यास हरकत असल्याने आज काँग्रेस पक्षाने दबाव वाढवण्यासाठी सकाळी १० वाजता काँग्रेस नेत्यांची बैठक बोलवली तर त्यानंतर महाविकास आघाडी समन्वयसमितीच्या नेत्यांची चर्चा होणार आहे.

काँग्रेस पक्षाची नाराजी कमी करत महाविकास आघाडी तुर्तास विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यात यशस्वी होते का की विधानसभा अध्यक्ष निवडणूक कार्यक्रम दिवसभरात जाहीर होणार याकडे लक्ष आहे. शिवसेना पक्षाच्यावतीने शेवटच्या दोन दिवसाच्या अधिवेशनामध्ये सर्व आमदारांनी विधिमंडळात उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचा आदेश काढला आहे.

मुथूट फायनान्स उभं करणाऱ्या उद्योजकाचा अपघातात मृत्यू; पाय घसरल्याचं निमित्त

विधानसभा अध्यक्ष निवडणूक घ्यावी यासाठी कॉंग्रेस आग्रही असतानाच काँग्रेस पक्षाच्या वतीने या पदासाठी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर आहे. त्याच वेळी काँग्रेसचे सुरेश वरपुडकर यांच्यासह कदाचित एखाद्या कॅबिनेट मंत्री राजीनामा घेत विधानसभा अध्यक्ष निवडणूक संधी देण्याची शक्यताही वर्तवली जात आहे, परंतु विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घेणार का की काँग्रेसची नाराजी इतर माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार याकडे लक्ष आहे.

First published:
top videos