मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /अखेर शरद पवारांची एंट्री, अधिवेशनात भाजपला उत्तर देण्यासाठी अजितदादांना दिली सूचना

अखेर शरद पवारांची एंट्री, अधिवेशनात भाजपला उत्तर देण्यासाठी अजितदादांना दिली सूचना

शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याच दूरध्वनीवरून चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याच दूरध्वनीवरून चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याच दूरध्वनीवरून चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई, 10 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे (Maharashtra Budget 2021) आज सूप वाजणार आहे. तर दुसरीकडे भाजप (BJP) नेत्यांनी मनसुख हिरेन (Mansukh Hiren death case) मृत्यू प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांच्या निलंबनाची आणि अटकेची मागणी केली आहे. अखेर या वादाची आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दखल घेतली आहे.

विधानसभेत सचिन वाझे यांच्या निलंबनाच्या मागणीवरून झालेल्या गदारोळावरून शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याच दूरध्वनीवरून चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस कर्मचाऱ्याचा सासुरवाडीत अंधाधुंद गोळीबार, पत्नी आणि सासू-सासऱ्यांची हत्या

या प्रकरणावरून आज काय भूमिका घ्यायची याबाबत चर्चा पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  आज अर्थसंकल्प मंजूर करून घेणे हीच भूमिका सत्ताधारी पक्षाची ठेवण्याच्या सूचना पवारांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता होणार आहे. 1 ते 10 मार्च अशा 10 दिवसीय अधिवेशनात 8 दिवसांचे कामकाज होतं. त्यातला आजचा शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवसभरात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विधानसभेत अर्थसंकल्पावर चर्चा असणार आहे. यात खातेनिहाय चर्चा होणार आहे. २४ खात्यांबद्दल चर्चा होणं अपेक्षित आहे. याशिवाय विरोधी पक्षातर्फे नियम 296 अन्वये मांडण्यात आलेल्या कायदा आणि सुव्यवस्था या विषयावर चर्चेला गृहमंत्री अनिल देशमुख हे उत्तर देतील. याशिवाय नियम २९२ अन्वये विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे, त्यावरही चर्चा अपेक्षित आहे.

आधी 53 हजार नंतर पाठवले 1 लाखांचे वीज बिल, ग्राहकाने डोक्याला लावला हात!

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्त्वांकांक्षी प्रकल्प असलेल्या 33 कोटी वृक्ष लागवड विशेष मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी केली जाणार असल्याची घोषणा सरकारतर्फे केली गेली होती. त्या समितीचीही आज स्थापना केली जाणार आहे.

हे असं सगळं कामकाज जरी कागदावर दिसत असलं तरीही प्रत्यक्ष सभागृह सुरू झाल्यानंतर नेमकी विरोधक काय भूमिका घेतात, हे पाहणे ही सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे.

First published:
top videos

    Tags: Hiren mansukh, Mumbai, Sharad pawar