सोनिया गांधींच्या एका निर्णयाने उद्धव ठाकरेंना दिला मोठा दिलासा; आमदारकीचा मार्ग मोकळा

सोनिया गांधींच्या एका निर्णयाने उद्धव ठाकरेंना दिला मोठा दिलासा; आमदारकीचा मार्ग मोकळा

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महत्वपूर्ण निर्णय घेत विधानपरिषदेसाठीच्या काँग्रेस उमेदवाराची घोषणा केली आहे.

  • Share this:

मुंबई, 9 मे : विधानपरिषद निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. जागावाटपासाठी महाविकास आघाडीमध्ये बैठकांचं सत्र सुरू होतं. त्यातच आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महत्वपूर्ण निर्णय घेत काँग्रेस उमेदवाराची घोषणा केली आहे.

काँग्रेसकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी राजेश राठोड यांना  उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने तुर्तास एकच उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेस दुसरी जागा लढवणार का याकडे लक्ष लागलं आहे.  काँग्रेसने एकच जागा लढवल्यास राज्यातील विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. सध्या तरी काँग्रेसने एकाच उमेदवाराची घोषणा केल्याने निवडणूक रिंगणात असलेल्या मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे.

भाजपकडून कोण आहे मैदानात?

दिग्गज नेत्यांना डावलत भाजपने विधानपरिषदेसाठी यावेळी नवीन नेत्यांना संधी दिली आहे. डॉक्टर अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

डावललेल्या पंकजा मुंडेंची काय आहे प्रतिक्रिया?

भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. या ट्विटमध्ये पंकजा यांनी भाजपच्या या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नसल्याचे म्हटलं आहे. यामुळे पंकजा मुंडेंना कदाचित याची कल्पना होती का, याची चर्चा होऊ लागली आहे. भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतर अनेकजण फोन करुन दु:ख व्यक्त करत आहेत. पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना 'तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही' बस साहेबांचे आशीर्वाद आहेत. दिवसभर फोन उचलले नाही. कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजपच्या त्या चारही उमेदवारांना आशीर्वाद, असे पंकजा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अन्य बातम्या

फडणवीसांनी केला थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, पुढे काय घडलं?

मुंबईतून मृतदेह थेट कोल्हापूरला नेला, 2 जणांना झाली कोरोनाची लागण

First published: May 9, 2020, 6:49 PM IST

ताज्या बातम्या