सामना रंगणार, विधानपरिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी हे दोन उमेदवार आमने-सामने

सामना रंगणार, विधानपरिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी हे दोन उमेदवार आमने-सामने

राज्यात विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी उद्या निवडणूक होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 7 सप्टेंबर : कोरोनाचं संकट आणखी गडद होत असतानाच राज्यात विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी उद्या निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपनेही आपला उमेदवार रिंगणार उतरवला. महाविकास आघाडीकडून नीलम गोऱ्हे या मैदानात असणार आहेत, तर भाजपकडून त्यांना भाई गिरकर हे आव्हान देतील.

विधानपरिषद निवडणुकीत गैरहजर आमदारांना मतदान करण्याचा अधिकार द्यावा अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषद सभापतींना पत्र दिलं आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने नीलम गोऱ्हे यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला. त्यानंतर भाजपकडून भाई गिरकर यांनी अर्ज भरला.

देवेंद्र फडणवीसांनी केला आरोप

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निवडणुकीबाबत चर्चा झाली नव्हती. मात्र तरी देखील निवडणुकीचा घाट घातला जात आहे, असा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसंच ही निवडणूक जाहीर करण्यात आली असल्याने आम्ही आमचा उमेदवार दिला आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. विधान परिषद उपसभापती पदासाठी उद्या निवडणूक होत आहे.

काय आहे विधानपरिषदेतील संख्याबळ?

एकूण - 78

राष्ट्रवादी - 9

काँग्रेस - 8

शिवसेना - 14

भाजप - 22

लोकभारती - 1

पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया - 1

राष्ट्रीय समाज पक्ष - 1

अपक्ष - 4

रिक्त - 18

Published by: Akshay Shitole
First published: September 7, 2020, 5:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading