राहुल गांधींची डोकेदुखी वाढली; महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी लोकसभा लढण्यास दिला नकार

राहुल गांधींची डोकेदुखी वाढली; महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी लोकसभा लढण्यास दिला नकार

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस जोरदार तयारी करत असतानाच महाराष्ट्रातील नेते मात्र राहुल गांधी यांची डोकेदुखी वाढवत आहेत.

  • Share this:

मुंबई, 12 फेब्रुवारी: मोदी सरकारवर जोरदार टीका करुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पक्षाला पुन्हा एकदा रुळावर आणण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पक्षातील नेत्यांकडून कटकटींचा सामना करावा लागत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस जोरदार तयारी करत असतानाच महाराष्ट्रातील नेते मात्र त्यांची डोकेदुखी वाढवत आहेत.

हे देखील वाचा: प्रियांका गांधी यांनी शक्ती प्रदर्शन तर केले, पण या 5 आव्हानांचे काय?

लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. अशा वेळी राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. धक्कादायक म्हणजे एक-दोन नव्हे तर तब्बल आठ दिग्गज नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्रातील या नेत्यांच्या नकारामुळे राहुल गांधी यांना मोठ्या डोकेदुखीला सामोरे जावे लागू शकते.

काही महिन्यांपूर्वी राहुल गांधी यांनी पक्षातील ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना मोठ्या अपेक्षेने महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून पाठवले होते. पण आता महाराष्ट्र काँग्रेसच्या कारभारात राहुल गांधी यांनी हस्तक्षेप केल्याशिवाय मार्ग निघेल असे वाटत नाही. 2014मध्ये मोदी लाटेत राज्यातील 48 पैकी काँग्रेसला केवळ दोनच जागा मिळाल्या होत्या. त्यात विद्यमान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडमधून तर राजीव सातव यांनी हिंगोलीतून विजय मिळवला होता. सातव सध्या गुजरातचे प्रभारी आहेत.

या दिग्गज नेत्यांनी दिला निवडणूक लढवण्यास नकार

राजीव सातव- लोकसभेत महाराष्ट्रतून गेलेल्या दोन पैकी एक खासदार राजीव सातव यंदा निवडणूक लढवण्यास इच्छूक नाहीत. गेल्याच म्हणजे 2014च्या निवडणुकीत सातव यांनी निसटता विजय मिळवला होता. 2009मध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे होती. पण 2014मध्ये सातव यांच्या विजयात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे सातव यांनी केवळ 1 हजार 632 मतांनी विजय मिळवला होता.

अशोक चव्हाण- राज्यातील काँग्रेसचे दुसरे खासदार अशोक चव्हाण यांना देखील यंदा निवडणूक लढवायची नाही. चव्हाण यांनी नांदेडमधून पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव दिला आहे. अर्थात काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांच्यासाठी अमेठी वगळता अन्य एका जागेचा शोध सुरु आहे. राहुल गांधी यांच्यासाठीचा दुसरा सुरक्षित मतदार म्हणजे नांदेड असे मानले जाते.

चव्हाण आणि सातव या दोघांनी निवडणू्क लढवणार नसल्याचे पक्षाला सांगितले आहे.

वाचा:काँग्रेस आता फ्रंटफुटवर खेळणार, नरेंद्र मोदी चोरच - राहुल गांधी

...म्हणून चव्हाण निवडणूक लढवणार नाहीत

अशोक चव्हाण यांचे निवडणूक न लढवण्यामागील एक कारण असे देखील सांगितले जाते की ते स्वत:ला मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पाहत आहेत. त्यामुळेच लोकसभे ऐवजी त्यांना विधानसभा निवडणूक लढवायची आहे. अशीच अवस्था माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची देखील आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातून त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरु आहे. या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात चर्चा देखील झाली आहे. पण पृथ्वीराज यांनी लोकसभे ऐवजी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पृथ्वीराज यांना कराडमधून विधानसभा लढवायची आहे.

मुत्तेमवार यांचा देखील नकार

राज्यातील दिग्गज नेते विलास मुत्तेमवार हे देखील पक्षातील गटबाजीला कंटाळले आहेत. सतीश चतुर्वेदी आणि नितिन राऊत गटाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी निवडणू्क न लढवण्याचे ठवल्याचे सूत्रांकडून कळते. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या विरोधात गटबाजीत अडकलेल्या काँग्रेसला कसे काय यश मिळू शकेल, असे मत मुत्तेमवार यांच्या निकटवर्तीयांचे आहे.

प्रिया दत्त आणि मिलिंद देवरा

माजी खासदार प्रिया दत्त आणि मिलिंद देवरा यांनी याआधी राहुल गांधी यांनी निवडणूक लढवणार नाही ,असे कळवले आहे. अर्थात प्रिया दत्त यांनी कौटुंबिक जबाबदारीचे कारण सांगितले आहे. दक्षिण मुंबईचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री तसेच राहुल गांधी यांचे जवळचे मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक लढवणार नसल्याचे सांगत सर्वांना धक्का दिला होता. काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले होते. या दोघांबरोबच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम हे देखील उत्तर मुंबईतून निवडणूक लढवण्यास उत्सुक नाहीत. त्यांना उत्तर पश्चिम हा मतदारसंघ हवा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडीतून मुज्जफर हुसैन यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पण त्यांना देखील भिवंडीतून निवडणूक लढायची नाही.

निवडणूक न लढवण्याचे कारण काय?

काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोटाबंदीमुळे अनेक नेत्यांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. अशा स्थितीत अनेक नेते मंडळी लोकसभा निवडणुकीत होणारा खर्च टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच पक्षाकडून देखील निवडणुकीसाठी फार मोठी आर्थिक मदत मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. भाजप आगामी निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च करणार याची कल्पना काँग्रेसच्या नेत्यांना आहे. भाजप पैशांच्या जोरावर मतदारांना प्रभावित करु शकतात असे काँग्रेसच्या नेत्याचे मत आहे.

स्टाईल, डायलॉगबाजीनंतर उदयनराजेंचं गाणं, हमे तुमसे प्यार कितना...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 05:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading