मुंबईतल्या या जमिनीचे भाव देशात सगळ्यात जास्त, किंमत ऐकून धक्का बसेल

मुंबईतल्या या जमिनीचे भाव देशात सगळ्यात जास्त, किंमत ऐकून धक्का बसेल

BKCत MMRDAची 3 एकर जागा आहे. MMRDA ही जागा विकणार आहे. त्यासाठी एक एकर जागेची किंमत 745 कोटी एवढी ठेवली आहे.

  • Share this:

मुंबई 28 जून : देशात जगळ्यात जास्त जमीनीचे भाव हे मुंबईत आहेत. जगातल्या महागड्या शहरांमध्येही मुंबईचा समावेश होतो. इथल्या जमीनीचे भाव तर दंतकथाच झाल्या आहेत. मात्र सध्या ज्या जमीनीच्या सौद्याची  तयारी सुरू आहे त्याचा भाव ऐकला तर धक्काच बसण्याची शक्यता आहे. 3 एकर जागेसाठी एक जपानी कंपनी तब्बल 2 हजार 238 कोटी मोजायला तयार झालीय. हा सौदा झाला तर तो देशातला एक विक्रमच ठरण्याची शक्यता आहे.

मुंबईतलं प्राईम लोकेशन असलेल्या ब्रांदा कुर्ला कॉम्पलेक्समध्ये म्हणजेच BKCत MMRDAची 3 एकर जागा आहे. MMRDA ही जागा विकणार आहे. त्यासाठी एक एकर जागेची किंमत 745 कोटी एवढी ठेवली आहे. MMRDA चे कार्यकारी संचालक दिलीप कवटकर यांनी या व्यवहाराची माहिती दिलीय. सध्या विक्रीची प्रक्रिया सुरू असून सगळ्या व्यवहाराला नेमके किती दिवस लागतील हे मात्र त्यांनी सांगितलं नाही.

BKC हा मुंबईतला अत्यंत श्रीमंत भाग समजला जातो. हा भाग सरकारने खास पद्धतीने विकसित केला असून तिथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. अमेरिकेची वकिलातही याच भागात असून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालयही इथे आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जांची प्रदर्शने, मोठे कार्यक्रम इथल्याच मैदानांवर होत असतात.

सुमितोमो कॉर्पोरेशन ही जपानची कंपनी ही जागा घेण्यासाठी इच्छुक आहे. 1919 मध्ये टोक्योत या कंपनीची स्थापना झाली होती. जगातल्या अनेक देशांमध्ये कंपनीची कार्यालय आहेत. पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, मीडिया, मेटल प्रॉडक्स, वाहतूक, उर्जा अशा अनेक क्षेत्रात कंपनीचं काम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: mumbai
First Published: Jun 28, 2019 06:02 PM IST

ताज्या बातम्या