• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • महाराष्ट्र हे खेदजनक राज्य, सुमित राघवन आता शरद पवारांच्या ताफ्यावर भडकला

महाराष्ट्र हे खेदजनक राज्य, सुमित राघवन आता शरद पवारांच्या ताफ्यावर भडकला

सुमित राघवन याने ट्वीट करून पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात घडलेल्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 28 जून: पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी (Mahalunge Balewadi) परिसरात उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात (International Sports University Pune) अ‍ॅथेलिटिक ट्रॅकवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या गाड्या उभा राहिल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. सिनेअभिनेता सुमित राघवन (Sumit Raghavan) याने 'महाराष्ट्र हे खरच खेदजनक राज्य आहे' असं म्हणत संताप व्यक्त केला आहे. सुमित राघवन याने ट्वीट करून पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात घडलेल्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र हे एक खेदजनक राज्य आहे, कोरोनाचे नियम असतील, कायदा सुव्यवस्था असेल किंवा करदाते असतील, यांचा अजिबात आदर राखला जात नाही, अशी नाराजी राघवन याने व्यक्त केली. तसंच, नवी मुंबईतील विमानतळासाठी नामकरणावर मोर्चे काढले जात आहे. दहीसर टोलनाक्यावर आंदोलन केले जात आहे. आणि आता खेळाडूंच्या ट्रॅकवर नेत्यांच्या गाड्या उभ्या राहत आहे, असंही राघवन म्हणाला. काय घडलं नेमकं? बालेवाडी परिसरात उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार आणि राज्यमंत्री अदिती तटकरे हे शिवछत्रपती क्रीडा संकुल इथं दाखल झाले होते.  तेव्हा त्यांच्या गाड्यांचा ताफा चक्क मुख्य अ‍ॅथलेटिक्स स्टेडियमच्या ट्रॅकवर उभा करण्यात आल्या होत्या. WTC Final: विराटचा जडेजाबद्दलचा निर्णय चुकला, सचिन तेंडुलकरचं मोठं वक्तव्य शासकीय क्रीडा अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे हा प्रताप घडून आल्याने क्रीडा क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे. सुमारे 5 कोटी रुपये खर्च करून हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक उभारला गेला आहे. खेळाडूंच्या सरावा व्यतिरिक्त इथं पायी चालण्याचीही परवानगी नसते. हे माहीत असून देखील, आलेल्या मंत्र्यांचे दोन मजले चढण्याच श्रम वाचावं आणि आपल्याला शाबासकी मिळावी  यासाठी क्रीडा अधिकाऱ्यांनी केल्या या करामतीमुळे  क्रीडा विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला. या प्रकारानंतर क्रीडा विद्यापीठाकडून याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली होती. तसंच, भविष्यात असे प्रकार घडणार नाही, अशी ग्वाही दिली. तर दुसरीकडे  शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी क्रीडा मंत्र्यांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी केली आहे.
  Published by:sachin Salve
  First published: