मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Maharashtra HSC Result: बारावी निकालाची मूल्यमापन पद्धत जाहीर, 'असा' असेल फॉर्म्युला

Maharashtra HSC Result: बारावी निकालाची मूल्यमापन पद्धत जाहीर, 'असा' असेल फॉर्म्युला

शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाच्या संदर्भातील मूल्यमापन पद्धत जाहीर केली आहे.

शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाच्या संदर्भातील मूल्यमापन पद्धत जाहीर केली आहे.

शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाच्या संदर्भातील मूल्यमापन पद्धत जाहीर केली आहे.

मुंबई, 2 जुलै: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाच्या संदर्भातील मूल्यमापन पद्धत जाहीर केली आहे. त्यानुसार, बारावी निकालासाठी (HSC Class 12 Result) सीबीएसई पॅटर्नचा वापर करण्यात येत असल्याचं दिसत आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावीसाठी) मूल्यमापन कार्यपद्धत जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून (Education Department) शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. पाहूयात कशी आहे ही कार्यपद्धती... (Maharashtra education board announced formula for evaluating of class 12th result)

इयत्ता दहावी मधील बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण यावर आधारित 30 टक्के गुण ग्राह्य धरले जातील. तर दुसरीकडे अकरावी परीक्षेच्या वार्षिक मूल्यमापन आतील विषयनिहाय गुण याचा 30 टक्के विचार केला जाईल इयत्ता बारावी वर्षभरात अंतर्गत मूल्यमापन आतील प्रथम सत्र परिक्षा सराव परीक्षा सराव चाचण्या तसेच मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण 40 टक्के ग्राह्य धरले जाणार आहेत.

शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे इयत्ता 10वी आणि इयत्ता 11वी या दोन्ही इयत्तांसाठी संपादणूकीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करुन वार्षिक निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये राज्यातील विविध भागातील उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालये या स्थानिक परिस्थितीमुळे एकाचवेळी सुरू होऊ शकल्या नाहीत. तसेच राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांत 12वी च्या मूल्यमापन प्रकियेतील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यापैकी सर्वच परीक्षा घेण्यात आल्या आहेत असे नाही. त्यामुळे 12वी परीक्षा सन 2021 साठी प्रविष्ट विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना लेखी, तोंडी / प्रत्यक्षिक / अंतर्गत मूल्यपापन यासाठी निर्धारित केलेले गुण कायम ठेवण्यात यावेत.

दहावी मार्क्स यावर 30 टक्के

11 इयत्ता मार्क्स यावर सरासरी 30 टक्के

12 इयत्ता यासाठी अंतर्गत परिक्षा यावर 40 टक्के गुण असतील

विद्यार्थ्यांनो, Google मध्ये इंटर्नशिप करायची आहे? मग फॉलो करा या टिप्स आणि व्हा यशस्वी

देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला. विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिता लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व संबंधीत घटकांशी चर्चा करून  मुल्यमापन प्रक्रिया शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी आज जाहीर केली.

गुण विभागणी तोंडी/प्रात्यक्षिक/ लेखी विषय विषय द्विलक्षी (व्यावसायिक) अभ्यासक्रम द्विलक्षी (व्यावसायिक) अभ्यासक्रम द्विलक्षी (व्यावसायिक) अभ्यासक्रम व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC) व्यवसाय अभ्यासक्रम अंतर्भुत आहे. विद्यार्थ्याची इ. 10 वी मधील मंडळाच्या परीक्षेतील संपादणूक, इयत्ता 11 वी च्या अंतिम निकालातील संपादणूक व इयत्ता 12वी चे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन विचारात घेऊन निश्चित करण्यात येतील. उपरोक्तप्रमाणे लेखी परीक्षेसाठी निर्धारित एकूण गुणांपैकी 30 टक्के गुण इयत्ता 10वी मधील मंडळाच्या परीक्षेतील संपादणूक, 30टक्के गुण इ. 11वी च्या अंतिम निकालातील संपादणूक व 40 टक्के गुण इयत्ता 12 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन यानुसार भारांश विचारात घेऊन दिले जातील. इयत्ता 10वी साठी भारांशानुसार प्राप्त गुण निश्चित करताना मंडळाच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण असलेले तीन विषय विचारात घेतले जातील.

इयत्ता 12वी च्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण लक्षात घेतले जातील.

श्रेणी विषयांचे मूल्यमापन

श्रेणी विषयांसाठी विहित पद्धतीने व यावर्षी मंडळाने दिलेल्या विशेष मार्गदर्शक सुचना विचारात घेऊन गुणदान करून विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या श्रेणी, संगणक प्रणालीमध्ये नमूद कराव्यात.

उपरोक्त कार्यप्रणालीनुसार अंतिम करण्यात आलेल्या निकालाने समाधान न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कोविड -19 ची परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर राज्य मंडळामार्फत प्रचलित पध्दतीनुसार आयोजित केल्या जाणाऱ्या लगतच्या परीक्षांमध्ये श्रेणीसुधार योजनेअंतर्गत लागू होणाऱ्या एक किंवा दोन संधी उपलब्ध असतील. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा श्रेणीसुधार योजनेचे (Class Improvement Scheme) सर्व नियम या विद्यार्थ्यांना लागू असतील.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रविष्ट असलेल्या 12 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

First published:

Tags: Exam result, HSC, Maharashtra