कोरोना संपलेला नाही! गृहमंत्री अनिल देशमुख पॉझिटिव्ह

कोरोना संपलेला नाही! गृहमंत्री अनिल देशमुख पॉझिटिव्ह

अनिल देशमुख काही दिवसांपूर्वी विदर्भाच्या दौऱ्यावर होते. गुरुवारीच ते नागपूरला परतले आहेत.

  • Share this:

मुंबई, 5 फेब्रुवारी : Coronavirus च्या लशीच्या (Corona Vaccine)बातम्या यायला सुरुवात झाली आणि राज्य शासनाने जनजीवन सुरळीत होण्याच्या दृष्टीने लॉकडाउनचे काही नियमही शिथिल केले, पण याचा अर्थ कोरोनाचा धोका संपलेला नाही. ही बातमी हेच सांगणारी आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. अनिल देशमुख यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. देशमुख यांनी स्वतः twitter वरून ही माहिती दिली.

"माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण माझी तब्येत ठीक आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्या", असं त्यांनी कळवलं आहे.

दरम्यान कोविडचे लसीकरण वेगाने सुरु आहे परंतू ब्रिटन, ब्राझीलमध्ये ज्या पद्धतीने कोरोनाचा संसर्ग पसरत आहे आणि मृत्यू होत आहेत ते पाहता आपण बेसावध न राहता अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना सादरीकरणाच्या वेळी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, समूह प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटीमुळे) आपल्याकडे लक्षणीयरित्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे असे जर आपण मानत असूत तर अशाच प्रकारे समूह प्रतिकारशक्तीनंतर देखील युरोपमध्ये संसर्गाची दुसरी जोरदार लाट आलेली दिसते हे लक्षात घ्यावं, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Published by: Meenal Gangurde
First published: February 5, 2021, 8:54 PM IST

ताज्या बातम्या