VIDEO : महाकाय लाटांनी वाहून आणला एवढा कचरा, राज्यभरात पावसाचा धुमाकूळ

VIDEO : महाकाय लाटांनी वाहून आणला एवढा कचरा, राज्यभरात पावसाचा धुमाकूळ

राज्यभरात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आणि भरतीमुळे उंचच उंच लाटा उसळत होत्या. या लाटांनी वाहून आलेला कचरा किनारपट्टीवर पसरल्याने अस्वच्छता जाणवत होती.

  • Share this:

मुंबई, 3 ऑगस्ट : राज्यभरात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आणि भरतीमुळे उंचच उंच लाटा उसळत होत्या. या लाटांनी वाहून आलेला कचरा किनारपट्टीवर पसरल्याने अस्वच्छता जाणवत होती. हा कचरा साफ करण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांची मोठी फौज किनाऱ्यावर उतरवावी लागली. किनारपट्टीवर जायलाही पोलिसांनी मज्जाव केला होता.

राज्यभरातच मुसळधार पाऊस सुरू आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणं काठोकाठ भरल्यामुळे पाणी नदीच्या पात्रात सोडण्यात येतंय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकमध्ये गेले काही दिवस संततधार सुरू असल्याने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे.

मुंबईत ठिकठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. रस्त्यांवरही पाणी भरल्यामुळे जनजीवन विस्कळित झालं आहे.

==================================================================================================

काळीज पिळवटून टाकणारा VIDEO, नदी ओलांडताना क्षणात वाहून गेल्या गायी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2019 06:20 PM IST

ताज्या बातम्या