सावधान! 7 ऑगस्टपर्यंत या भागांत होणार मुसळधार पाऊस

सावधान! 7 ऑगस्टपर्यंत या भागांत होणार मुसळधार पाऊस

राज्यात सगळीकडे मुसळधार पाऊस सुरू असून पावसाचा जोर कायम आहे. या वीकेंडला तर धुवाँधार पाऊस आहेच पण येता आठवडाही पावसाचा असणार आहे. महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीच्या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 3 ऑगस्ट : राज्यात सगळीकडे मुसळधार पाऊस सुरू असून पावसाचा जोर कायम आहे. या वीकेंडला तर धुवाँधार पाऊस आहेच पण येता आठवडाही पावसाचा असणार आहे. महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीच्या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा या राज्यांत मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

राज्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागांत पावसाचा जोर कायम असेल,अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.

4 ऑगस्ट : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, कोकण आणि गोव्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. विदर्भातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर नाशिक, सातारा आणि पुण्यातही जोरदार पाऊस पडेल. मराठवाड्यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.

5 ऑगस्ट : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र या भागांत चांगला पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

पाहा PHOTO : मुंबईत उसळलेल्या सर्वात उंच लाटेची थरकाप उडवणारी दृश्यं

6 ऑगस्ट : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र या भागांत जोरदार पाऊस होईल. कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागातही चांगल्या पावसाचा अंदाज आहे.

7 ऑगस्ट : कोकण, गोवा, कर्नाटकची किनारपट्टी या भागात मुसळधार पाऊस पडेल. विदर्भ, मध्य महाराष्ट्रतही जोरदार पावसाचा अंदाज आहे.

========================================================================================

काळीज पिळवटून टाकणारा VIDEO, नदी ओलांडताना क्षणात वाहून गेल्या गायी

First Published: Aug 3, 2019 05:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading