मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

पुढील 7-8 दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे, आरोग्यमंत्र्यांनी दिला इशारा

पुढील 7-8 दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे, आरोग्यमंत्र्यांनी दिला इशारा

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 1135 झाला आहे. सर्वाधिक संख्या मुंबईत आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 1135 झाला आहे. सर्वाधिक संख्या मुंबईत आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 1135 झाला आहे. सर्वाधिक संख्या मुंबईत आहे.

  • Published by:  Sandip Parolekar
मुंबई, 8 एप्रिल: कोरोना विषाणूने राज्यात अक्षरश: थैमान घातलं आहे. राज्यात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 1135 झाला आहे. सर्वाधिक संख्या मुंबईत आहे. संपूर्ण राज्यासाठी पुढील 7-8 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहे, सगळ्यांनी खबरदारी घ्या, सरकारने दिलेल्या सूचनांच पालन करा, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहाता मुंबई- पुण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबई आणि पुण्यात मास्क वारपणे बंधनकारक करण्यात आली आली असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. हेही वाचा.. पुण्यात चिंता वाढवणारा दिवस; गेल्या 24 तासांत 8 मृत्यू! आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, सुदैवाने राज्य कोरोनाच्या तिसऱ्या फेजमध्ये नाही. सध्या राज्यात रुग्णांची बेरीज होत आहे. गुणाकार होताना दिसत नाही.  मात्र, ज्येष्ठ नागरिकांच्या मृतांची संख्या जास्त आहे. ही चिंतेची बाब आहे. राज्यात बुधवारी 117 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. अमेरिका, इटलीसारख्या अनेक देशांच्या तुलनेत देशात कोरोना रुग्णांची वाढ गुणाकाराच्या पद्धतीने होण्याची भीती वाटत होती. मात्र, सुदैवाने तसे होत नाही आहे.  देशांमध्ये 30 व्या दिवशी 1 लाख 21 हजार इतके संसर्ग झालेले रुग्ण आहेत. त्याच्या तुलनेत आपल्या देशात या रुग्णांची संख्या 5000 दरम्यान आहे. हेही वाचा.. LockDown मध्ये उरकलं लग्न, नातेवाईकांनी वधुवरांना 'असे' दिले आशीर्वाद आणखी काय म्हणाले आरोग्यमंत्री..? -मुंबई, पुणे शहरात मास्क वापरणे बंधनकारक - सुदैवाने राज्य कोरोनाच्या तिसऱ्या फेजमध्ये नाही. - सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. - ज्येष्ठ नागरिकांच्या मृतांची संख्या जास्त, चिंतेची बाब. -ज्या भागात कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्या भागात मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. - रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांवर केवळ कोरोनाचाच नाही तर सर्व प्रकारचे उपचार केले जात आहेत. - आगामी 7 - 8 दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. - जगातील इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातील परिस्थिती नियंत्रणात आहे. - समाधानकारक बाब म्हणजे, डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. -धारावी पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. - प्रत्येक तालुक्यात रक्षक रुग्णालय लवकरच सुरु करण्यात येणार आहे. - सर्व नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करावे. - राज्यात कोरोनामुळे मृतांच प्रमाण 6 टक्के आहे. - मोठ्या शहरात मोबाइल क्लीनिंग केले जात आहे. -रॅपिड टेस्टची केंद्राकडून परवानगी मिळाली आहे. लॉकडाऊन हटवल्यानंतर रॅपिड टेस्टकडे लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. संपादन- संदीप पारोळेकर
First published:

Tags: Corona, Coronavirus

पुढील बातम्या