महाराष्ट्र पुन्हा हादरला! रुग्णवाढीचा आणि मृत्यूचा नवा उच्चांक; 24 तासांत 3874 नवे रुग्ण

आज मुंबई आणि पुण्यातही रुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ झाली आहे. Unlock झाल्यानंतर वाढ झपाट्याने होत असून आणखी काही दिवस ही वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आज मुंबई आणि पुण्यातही रुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ झाली आहे. Unlock झाल्यानंतर वाढ झपाट्याने होत असून आणखी काही दिवस ही वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

  • Share this:
मुंबई 20 जून: राज्यात आज रुग्णवाढीचा आणि मृत्यूंचा नवा उच्चांक झाला. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात3874 नवे रुग्ण आढळले. तर आज तब्बल 160 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात राज्यात एकूण 128205 रुग्ण झाले आहेत. तर 5148 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला. राज्यातल्या 160 पैकी तब्बल  136 मृत्यू फक्त मुंबईतले आहेत. या संख्येमुळे महाराष्ट्र  हादरुन गेला आहे. मुंबईत आज 1190 रुग्णांची वाढ झाली. तर तब्बल 136 जणांचा मृत्यू झाला. एका दिवसात आज सर्वाधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची एकूण संख्या ही 65329 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 3561 वर गेला आहे. पुणे जिल्ह्यातही एकाच दिवशी सर्वाधिक 823 रुग्ण वाढले असून पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदाच 381 रुग्ण आढळले असून जिल्ह्याचा आकडा 15 हजारांच्या पुढे गेला आहे. दिवसभरात 15 जणांचा कोरोनाने बळी गेला असून आत्तापर्यंत 584 मृत्यू झालेत. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. आज सलग सातव्या दिवशी नवीन रुग्णांचा आकडा 10 हजारहून अधिक आहे. आज 24 तासांत तब्बल 14 हजार 516 नवीन रुग्ण आढळून आले. आतापर्यंतची ही सर्वात जास्त आकडेवारी आहे. यासह एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 4 लाखांच्या घरात गेला आहे. चिंताजनक! लक्षणं न दिसणाऱ्या रुग्णांना कमजोर बनवतोय कोरोनाव्हायरस तर, गेल्या 24 तासांत 375 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 3 लाख 95 हजार 048 एकूण कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 1 लाख 68 हजार 269 सक्रीय रुग्ण आहेत. तर, 2 लाख 13 हजार 831 रुग्ण निरोगी झाले आहे. आतापर्यंत 12 हजार 948 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे महापालिकेच्या 112 कर्मचाऱ्यांना कोरोना, समोर आली धक्कादायक माहिती दुसरीकडे भारताचा रिकव्हरी रेट भारताचा वाढता आहे. रिकव्हरी रेट आता 53.8% हून 54.1% झाला आहे. यात महाराष्ट्रात देशातील सर्वात जास्त रुग्ण असले तरी, एक दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 5 दिवसांपासून महाराष्ट्रातील निरोगी रुग्णांचा आकडा हा 50% आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 3827 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, 1935 रुग्ण निरोगी झाले. महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या आता 1 लाख 24 हजार 331 झाली आहे. तर, 62 हजार 773 रुग्ण निरोगी झाले आहे.    
First published: