Home /News /mumbai /

राज्यात कोरोनाची आकडेवारी वाढता वाढे, गेल्या 24 तासात पुन्हा संख्या 50 हजार पार!

राज्यात कोरोनाची आकडेवारी वाढता वाढे, गेल्या 24 तासात पुन्हा संख्या 50 हजार पार!

आज राज्यात 58,952 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 278 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

    मुंबई, 14 एप्रिल : राज्यात कोरोनाची (Corona) साखळी तोडण्यासाठी आजपासून लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. पण गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित (maharashtra corona cases) रुग्णांची संख्या दररोज 50 हजारांच्या पुढेच आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 58952 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर 278 रुणांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारकडून कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 39,624 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. आजपर्यंत एकूण 29,05,721कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.21 एवढे झाले आहे. 200 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खोटी पोस्ट करणारा गजाआड आज राज्यात 58,952 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 278 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.64 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,28,02,200 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 35,78,160 (15.86 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 34,55,206 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 28,494 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या 6,12,070 रुग्ण ऍक्टीव्ह आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात 50 हजारांच्या पुढे रुग्ण आढळून आले आहे. maharashtra lockdown : लॉकडाऊन 2.0 सुरू, जाणून घ्या काय सुरू काय बंद! दरम्यान, आजपासून राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. राज्यात आज 14 एप्रिल 2021 रात्री 8 वाजल्यापासून 1 मे 2021 पर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अनेक निर्बंध राज्य सरकारने जाहीर केले आहे. 'गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता , मात्र आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे त्यामुळे ब्रेक दि चेन मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Covid-19

    पुढील बातम्या